Rain and Hail : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस व गारपिटीची शक्यता
1 min read🔆 मराठवाडा
➡️ मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यात बुधवारी (दि. 28 फेब्रुवारी) शनिवार (दि. २ मार्च) या चार दिवसात ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. बुधवार (दि. 28 फेब्रुवारी) ते शुक्रवार ( दि. 1 मार्च) या तीन दिवसात मराठवाड्यात गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 विदर्भ व कोकण
➡️ विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात शुक्रवार (दि. 1 मार्च) व शनिवार (दि. 2 मार्च) या दाेन दिवसात ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात बुधवार (दि. 28 फेब्रुवारी) व गुरुवारी (दि. 29 फेब्रुवारी) हे दाेन दिवस ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 अवकाळीचे वातावरण टिकून
➡️ सध्या मार्गस्थ होत असलेल्या पश्चिम झंजावाताबरोबरच गुरुवारी ( दि. 29 फेब्रुवारी) पुन्हा एक पश्चिम झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी, अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूरपर्यंत पसरलेल्या समुद्र सपाटीपासून जवळपास 1 किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस यांच्या एकत्रित परिणामातून संपूर्ण उत्तर भारतात शनिवार (दि. 2 मार्च)पर्यंत (विशेषतः 1 व 2 मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फवृष्टी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
➡️ या वातावरणीय परिणामबरोबरच कर्नाटकतील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरीपर्यंत समुद्र सपाटीपासून जवळपास 1 किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता किमान चार दिवस टिकून आहे.