Rain and Hail : विदर्भात पावसासाेबतच गारपिटीची शक्यता
1 min read🔆 मराठवाडा
मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यात रविवार (दि. 25 फेब्रुवारी) ते मंगळवार (दि. 27 फेब्रुवारी) या तीन दिवसांत केवळ ढगाळ वातावरण राहून ढगांचा गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः जालना, हिंगोली, परभणी व नांदेड या चार जिल्ह्यात ही शक्यता अधिक जाणवते.
🔆 खान्देश व मध्य महाराष्ट्र
साेमवार (एि. 26 फेब्रुवारी) ते मंगळवार (दि. 27 फेब्रुवारी) या दोन दिवसांत खान्देशातील सर्व जिल्हे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 10 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. जळगाव जिल्ह्यात ही शक्यता अधिक आहे.
🔆 कोकण
मुंबईसह कोकणात मात्र पावसाची शक्यता नाही. या भागात आकाशही निरभ्र राहील. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने सरासरीच्या खाली म्हणजे 16 ते 18 आणि 30 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान राहून तेथील वातावरण आल्हादायक जाणवेल.
🔆 थंडी
सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सद्यकाळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरलेले असून, किमान 12 ते 16 आणि कमाल 32 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. म्हणून अजूनही थंडी टिकून आहे.
थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करून सध्या जाणवत असलेल्या पाणीटंचाईच्या काळात थंडीमुळे रब्बी पिकांना नकळत काहीसी मदतच मिळत आहे.