krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agricultural work : डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या कृषिकार्याची दिल्लीत दखल

1 min read

Agricultural work : ‘बायोम टेक्नॉलॉजीज’चे सीईओ व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल प्रभाकर गाडगे यांनी दिल्ली मध्ये TEDx या प्रभावी व्यासपीठावर मातीतील सूक्ष्मजीवांच्या आरोग्याचे महत्त्व आणि अवशेषमुक्त शेती याबाबत आपल्या कामाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्याची मृदा तपासणी प्रामुख्याने रासायनिक घटकांवर आधारित आहे; मात्र मातीचा जिवंतपणा (सूक्ष्मजीव जैविक क्रिया ) मोजली जात नाही. हे सूक्ष्मजीव पिकाला जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे, कार्बन संचयन करणे, कीटकनाशकांचे विघटन करणे, पिकांना मजबुती देणे आणि अन्नातील पोषणमूल्य वाढविणे यासाठी कारणीभूत आहेत.

डॉ. गाडगे यांच्यामार्फत पारनेर येथे मागील सहा वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी कृषिरसायने साक्षरता प्रशिक्षण चालवले जात आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘सॉईलोमीटर’ या तंत्राला भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) ची मान्यता मिळाली असून, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या हस्ते या तंत्राचे अनावरण करण्यात आले आहे. जवळपास 20 हजारांहुन अधिक शेतकऱ्यांनी या तंत्राचा लाभ घेत आपल्या पिकाचा उत्पादन खर्च कमी करत भरघोस नफा मिळवला आहे. डॉ. गाडगे यांच्या प्रशिक्षण आणि तंत्राचा लाभ घेतलेले 50 हून अधिक शेतकऱ्यांना दिल्ली मध्ये ‘मिलियनर फार्मर’ या पुरस्काराचा मान मिळाला आहे.

डॉ. गाडगे यांनी स्पष्ट केले की, मातीतील जैविक संतुलन सुधारल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन आणि अन्नसुरक्षा वाढते. बायोम टेक्नॉलॉजीजच्या सूक्ष्मजीव निदान तंत्रज्ञान व जैविक उपाययोजनांद्वारे शाश्वत व अवशेषमुक्त शेतीला चालना दिली जात आहे.

©️ “निरोगी माती → उत्पादक शेती → पौष्टिक अन्न → सक्षम राष्ट्र,” असा संदेश त्यांनी TEDx व्यासपीठावरून दिला.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!