CM’s stay at Loharisavanga : … मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे? पिकवोनीहि ते उपाशी॥
1 min read
CM’s stay at Loharisavanga : मुख्यमंत्री (CM – Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घाेषणा केल्याप्रमाणे ते दिवाळीचा (Diwali) सण साजरा करण्यासाठी रामभाऊ बालपांडे, रा. लाेहारीसावंगा, ता. नरखेड, जिल्हा नागपूर यांच्याकडे शनिवारी (दि. 7 नाेव्हेंबर 2026) रात्री मुक्कामी हाेते तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ते लाेहारीसावंगा येथील नंदू लाेहे यांच्याकडे मुक्कामी हाेते. या दाेन मंत्र्यांसाेबत तीन आमदारांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाेहारीसावंगा (Loharisavanga) येथे मुक्काम (Stay) ठाेकला. या कार्यक्रमाच्या प्रिंट व इलेक्ट्राॅनिक मीडियातील सकारात्मक कव्हरेजमुळे सरकार व नेत्यांचा उद्देश साध्य झाला असला तरी या नेत्यांचा मुक्कामामागचा मुख्य हेतू काय हाेता? त्यांनी मुक्कामासाठी ऐनवेळी लाेहारीसावंगा गावाचीच निवड का केली? त्यांना शेतकऱ्यांसाेबत संवाद साधायचा असताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज (Rashtrasant Trukeji Maharaj) यांची सामूदायिक प्रार्थना करीत भजने का केली? भजने करताना मुख्यमंत्र्यांनी कधी नव्हे ती खंजिरी का वाजवावी? या कार्यक्रमाचा आणि अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज माेझरी (Gurukunj Mozari) येथे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या काही अनुयायांनी केलेल्या आत्मक्लेश आंदाेलनाचा आपसात काय संबंध आहे? या प्रश्नांची उकल हाेणे गरजेचे आहे.
♻️ राष्ट्रसंतांची पुण्यतिथी व वादग्रस्त वक्तव्य
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांनी गुरुकुंज माेझरी येथे सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी देह ठेवला. त्यामुळे दरवर्षी 30 ऑक्टाेबरला राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना ठिक 4 वाजून 58 मिनिटांनी महाराजांच्या समाधीस्थळी माैन श्रद्धांजली अर्पण करण्याची व त्यापूर्वी महाराजांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारी एक स्क्रिप्ट (Script) वाचण्याची परंपरा आहे. ही स्क्रिप्ट महाराजांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे तयार केली जाते. यावर्षी (30 ऑक्टाेबर 2026) महेश तिवारी यांनी स्क्रिप्टचे वाचन केले. या स्क्रिप्टमध्ये ‘कुछ गद्दार, साजिश, भाषवाद संघर्ष, उग्र व हिंसक चेहरा, अराजकता’ या शब्दप्रयाेगांचा वापर अप्रत्यक्षरित्या देशातील विद्यार्थी व तरुणांच्या आंदाेलनासंदर्भात करण्यात आला. या शब्दप्रयाेगांमुळे महाराजांच्या अनुयायांमध्ये असंताेष निर्माण झाला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे काही पदाधिकारी ही चूक मान्य करायला व माफी मागायला तयार नसल्याने स्थानिक अनुयायांनी या प्रकाराच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 6 नाेव्हेंबर) महाराजांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदाेलनाची घाेषणा केली हाेती.
♻️ जनार्दन बाेथे व मुख्यमंत्री भेट
या आत्मक्लेश आंदाेलनाची माहिती मिळताच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस (General Secretary) जनार्दन बाेथे यांनी गुरुवारी (5 ऑक्टाेबर 2026) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांनी त्या स्क्रिप्टमुळे अनुयायांच्या मनात निर्माण झालेला राेष व आत्मक्लेश आंदाेलनाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आंदाेलन हाेऊ द्या, तुम्ही चिंता करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी बाेथे यांना दिला. शुक्रवारी (दि. 6 नाेव्हेंबर 2026) सकाळी अनुयायांना महाराजांच्या समाधीस्थळी जाण्यास पाेलिसांनी मज्जाव केला हाेता. नंतर चंद्रकांत वानखडे यांच्या नेतृत्वात अनुयायांनी दिवसभर आत्मक्लेश आंदाेलन केले.
♻️ मुक्कामासाठी लोहारीसावंगा निवडण्याचे कारण
जनार्दन बाेथे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या मुक्कामासाठी नागपूर जिल्ह्यातील गाव ठरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. गाव ठरविताना त्या गावात श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा असणे आवश्यक असल्याचे नेत्यांना सांगण्यात आले. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा नरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये असल्याने आधी भिष्णूरची निवड करण्यात आली. परंतु, तिथे शाखा नसल्याने अखेर लाेहारीसावंगा गावाची निवड केली गेली. याच तालुक्यातील थडीपवनी, मेंढला, उमठा, वडविहिरा या गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा असूनही ही गावे गैरसाेयीची म्हणजेच भाजपचे प्राबल्य नसलेली गावे असल्याने ती वगळण्यात आली. महाराजांच्या पुण्यतिथीच्या स्क्रिप्टवरून निर्माण झालेला वाद शमविण्यासाठी तसेच आपण देखील गुरुदेवभक्त आहाेत, हे दाखविण्यासाठीच मुळात लाेहारीसावंगा गावाची निवड करण्यात आली.
♻️ गुरुदेवभक्त असल्याचे नाटक
मुख्यमंत्र्यांच्या लाेहारीसावंगा येथील मुक्कामात शेतकरी संवादासाेबतच महाराजांची सामूदायिक प्रार्थना आणि भजनाच्या कार्यक्रमाचे नियाेजनबद्ध आयाेजन करण्यात आले हाेते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सामूदायिक प्रार्थना व भजनासाठी गुरुकुंज माेझरी येथील खास भजन मंडळ बाेलावण्यात आले हाेते. या भजन मंडळाने त्यांच्यासाेबत खंजेरी व इतर वाद्ये आणली हाेती. मुख्यमंत्र्यांसह इतर लाेकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांसाठी पुरेशा प्रमाणात भगव्या टाेप्या देखील बाेलावण्यात आल्या हाेत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काटाेल मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर, सावनेर मतदारसंघाचे आमदार डाॅ. आशिष देशमुख, विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. राजीव पाेतदार यांच्यासह इतर सर्व नेत्यांनी त्यांच्या डाेक्यावर या भगव्या टाेप्या घातल्या हाेत्या. हीच मंडळी सामूदायिक प्रार्थना व भजनाच्या वेळी व्यासपीठावर विराजमान हाेती. ज्यांनी कधीच हातात टाळ धरला नसेल ते मुख्यमंत्री खंजिरी वाजवित महाराजांचे भजन गात हाेते. महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत ‘कच्चा माल मातीच्या भावें। तो पक्का होतां चौपटीने घ्यावें। मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे? पिकवोनीहि ते उपाशी॥’ असा उल्लेख केला आहे. शेतमाल व शेतकरी यांची आजही हीच अवस्था आहे. जी मंडळी त्यांच्या धाेरणांमुळे शेतमालाचा भाव पाडून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करीत आहेत, त्याच मंडळींनी डाेक्यात भगव्या टाेप्या घालून महाराजांची भजने म्हणत, आपण गुरुदेवभक्त आहाेत, हे दाखविण्याचे नाटक कशासाठी करावे?
♻️ शेतकरी संवादात शेतकऱ्यांची दिशाभूल
या मुक्कामात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संवाद देखील ठेवला हाेता. यात काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काेसळलेल्या माेसंबीच्या दराबाबत विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशात माेसंबीची निर्यात थांबल्यामुळे दर काेसळले असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आणि शेतकऱ्यांना सरकारच्या धाेरणांबाबत फारसा अभ्यास नसल्याने त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला. मुळात महाराष्ट्रातून काेणत्याही देशात माेसंबीची कधीच निर्यात करण्यात आली नाही आणि केलीही जात नाही. बांगलादेशात निर्यात व्हायची ही नागपुरी संत्र्याची! बांगलादेशात संत्रा निर्यात सुकर व्हावी यासाठी राज्य सरकारने 7 डिसेेंबर 2023 राेजी संत्र्याला प्रति किलाे 44 रुपये सबसिडी देण्याची घाेषणा करून त्यासाठी 169.60 काेटी रुपयांची तरतूद केली हाेती. ही सबसिडी व्यापाऱ्यांऐवजी 20 हजार रुपये प्रति एकरप्रमाणे शेतकऱ्यांना देण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी 2 ऑगस्ट 2024 राेजी दिली हाेती. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी हीच सबसिडी कुणालाही न देता 8 जून 2026 राेजी गाेठवली. विशेष म्हणजे, आ. चरणसिंग ठाकूर पणन मंत्रालयाच्या समितीचे सदस्य असताना ते डिसेेंबर 2023 पासून आजवर शब्दही बाेलायला तयार नाही. संत्रा निर्यातीसाठी प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी लाेहारीसावंगा येथे शेतकऱ्यांना दिले. राज्य सरकारने विदर्भात पाच ठिकाणी (नागपूर, कळमेश्वर, काटाेल, माेर्शी व संग्रामपूर) आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे (संत्रा निर्यात सुविधा केंद्र) उभारण्याची 8 नोव्हेंबर 2023 राेजी घाेषणा केली हाेती. राज्य सरकारने या केंद्रांसाठी आजवर एक रुपया देखील मंजूर केला नाही.
♻️ संघ विचारसरणीचा शिरकाव
अलीकडे गुरुकुंज माेझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS – Rashtriya Swayamsevak Sangh) विचारसरणीचा शिरकाव झाल्याचे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचन करण्यात आलेल्या स्क्रिप्टवरून स्पष्ट हाेते. हा शिरकाव नेमका कुणामुळे व कसा झाला? त्यांनी किती संपत्ती गाेळा केली? पुरस्कार कसे मिळविले? या बाबी सर्वश्रुत आहेत. ग्रामगीता व भजनांचा विचार करता राष्ट्रसंत निधर्मी, मानवतावादी व स्वतंत्रतावादी विचारसरणीचे असल्याचे स्पष्ट हाेते. म्हणूनच ते ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच ग्रामनाथाला उद्देशून म्हणतात, ‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळाे। सकलांचे लक्ष तुजकडे वळाे। मानवतेचे झळझळाे। विश्वमाजी या याेगे॥’ आरएसएसची विचारसरणी ही राष्ट्रसंतांच्या विचारसरणीच्या अगदी विराेधी आहे. याच विचारसणीने महाराजांच्या मूळ भजनांमध्ये माेडताेड करणे, महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असल्याचा अपप्रचार करणे, आपण गुरुदेवभक्त आहाेत, असा आव आणून डाेक्यात भगवी टाेपी घालणे, खंजिरी वाजविण्याची नाटके करणे या व तत्सम बाबी प्रामाणिक गुरुदेव भक्तांसाेबतच महाराजांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती गांभीर्याने विचारात घेणे आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळात शिरलेली आरएसएस विचारसरणी कायमची हद्दपार करण्यासाठी, राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी एकत्र येणे, प्रसंगी त्यासाठी लढा उभारणे हीच राष्ट्रसंतांसाठी खरी श्रद्धांजली ठरणार आहे. जय गुरुदेव!