Cold : उत्तर महाराष्ट्रात हूडहुडी, कोकणात मध्यम तर विदर्भ – मराठवाड्यात साधारण थंडी
1 min readमुंबईसह कोकणात 19 ते 23 जानेवारीपर्यंतच्या पाच दिवसात पहाटेचे किमान तापमान 14 डिग्री सेंटिग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री सेंटिग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्री सेंटिग्रेडने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या डिग्री सेंटिग्रेडने अधिक असेल.
विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात 19 ते 23 जानेवारीपर्यंतच्या पुढील पाच दिवसात पहाटेचे किमान तापमान 14 ते 16 डिग्री सेंटिग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 डिग्री सेंटिग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्री सेंटिग्रेडने अधिक दरम्यानचे असू शकते.
विदर्भात 23 जानेवारीनंतरतीन दिवसांसाठी म्हणजे 25 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.