Milk Subsidy : सत्ताधाऱ्यांकडून हाेणाऱ्या दूध अनुदान लुटीचा पर्दाफाश
1 min readअशीच कायदेशीर चोरी शासनाने उसाच्या एफआरपी ( FRP – Fair and Remunerative Price) बाबत पायाभूत साखर उतारा 8.5 टक्क्यांवरून वरून 10.25 टक्क्यांवर नेला आहे.
🔆 राज्य सरकारच्या 19 जून 2017 च्या जीआरप्रमाणे गाई व म्हशीसाठी प्रत्येक फॅट वाढीव 0.1 टक्के पॉईंटसाठी 30 पैसे वाढ निश्चित केली होती. एसएनएफच्या बदलासाठी काहीही निकष किंवा घट नव्हती. (SNF म्हणजे Solid-Not-Fat) प्रत्यक्षात काही दूध संघानी जो तक्ता दिला, त्याप्रमाणे प्रत्येक 0.1 टक्के फॅट घटीसाठी 50 पैसे कपात व वाढीसाठी 20 पैसे वाढ दिली आहे. प्रत्येक 0.1 टक्के एसएनएफ घटीसाठी 75 पैसे ते 1 रुपया कपात व वाढीसाठी 10 पैसे वाढ दिली आहे. ही कपात अत्यंत अन्यायकारक आहे. बरेच दूध संकलन केंद्र असा तक्ता बाहेर लावत नाहीत. त्यांनी तो लावावा, अशी पण आपली मागणी असावी.
🔆 दुधाचा दर हा अद्यावत दूध उत्पादन खर्च अधिक 15 टक्के नफा असावा. याबद्दलच्या बऱ्याच पोस्ट अगोदरच टाकल्या आहेत.
🔆 सोलापूर, कोकण वगैरे विभागाची दूध खर्चाची पण अधिकृत माहिती आमच्याकडे आली आहे. अहमदनगर जिल्ह्याने सन 2019 पासून खर्च काढायचे बंद केले आहे. कदाचित त्यांच्यावर वरून प्रेशर असेल. टिपिकल सोलापूरची सोबत जोडली आहे. त्याप्रमाणे गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च 62.28 रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च 95.35 रुपये प्रति लिटर आहे.
🔆 अहमदनगरमध्ये राज्य सरकारने गेल्या 10 वर्षातील अनुदान दिलेल्या दूध संघाचा तपशील माहिती अधिकारात मिळाला आहे. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी लोकांना भरपूर खिरापत वाटली आहे, असे या तपशीलावरून स्पष्ट दिसून येते. गोदावरी दूध संघ कोपरगाव यांना झुकते माप देऊन तब्बल 416.19 लाख रुपये अनुदानापाेटी दिले आहेत. अधिक माहिती काढल्यावर कळाले की, या दूध संघांचे चेअरमन राजेश परजणे आहेत, जे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे आहेत.
❇️ धवलक्रांती संघर्ष
❇️ एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!