Heat wave possibility : विदर्भ व खानदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता
1 min read🌞 संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशासह (Clear sky) सध्या स्वच्छ वातावरण जाणवत आहे. परंतु महाराष्ट्रातील संपूर्ण खानदेश (नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्हा) तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात (बुलडाणा, वाशिम, अकाेला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिराेली) पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता असून त्यानंतर कदाचित 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने तापमान उतरू शकते.
🌞 उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात (छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातूर) पुढील 5 दिवसात 2-3 डिग्री सेल्सिअसने दिवसाच्या कमाल तापमानात घट होवू शकते.
🌞 दिवसाचे कमाल उच्च तापमान (High temperature) व आर्द्रतायुक्त (Humidified) व गरम (hot) अशा हवेमुळे (Air) मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम राहणार असून, अजूनही पुढील 2 ते 3 दिवस म्हणजे मंगळवार (16 मे पर्यंत) जाणवू शकते.
🌞 ताशी 160 ते 170 किमी चक्रकार वादळी वारा (Whirl wind) वेगाचे अति तीव्र स्वरूप धारण केलेले ‘मोखा’ चक्रीवादळ रविवारी (दि. 14 मे) दुपारी 12.30 ते 2 वाजताच्या दरम्यान बांगलादेश व ब्रह्मदेशच्या सीमेवरील कोक्सबझार (बांगलादेश) व सीट्टवे जवळील कॅऊकपायऊ (ब्रह्मदेश) शहरादरम्यानच्या किनारपट्टीवर आदळले असून, ते सरळ ब्रह्मदेशाच्या भूभागावरून घुसून रविवारी (दि. 14 मे) मध्यरात्री किंवा साेमवारी (दि. 15 मे) सकाळपर्यंत विरळ होण्याची शक्यता जाणवते.
🌞 पूर्व व पूर्वोत्तर राज्यात अतिजोरदार वादळी वारा (Stormy wind) व जोरदार पावसाव्यतिरिक्त भारत देशाला ह्या चक्रीवादळाचा विशेष धोका नसण्याचे संकेत जाणवत होते. बांगलादेश व ब्रम्हदेशाला मात्र विशेष धोका पोहोचू शकतो.
🌞 बद्री-केदार पर्यटकासाठी तेथील वातावरण सध्या केवळ काहीसे ढगाळलेले राहून Agadich किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.