krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Water blocked, blown… : पाणी अडवले, उडवले, फिरवले आणि मगच जिरवले तर?

1 min read
Water blocked, blown... : पावसाचे पाणी (Rain water) जमिनीवर पडताच वाहून (flows) जाते. पण, तेच पाणी अडवले (Water blocked), उडवले (Blown), फिरवले (Swirled) आणि मगच जिरवले तर महाराष्ट्र शासनाचे 1,25,000 कोटी रुपयांची बचत होईल. यातून शेतकरी सुखी होईल व देशाचा विकास होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांना दररोज लागणारे पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत नदीतून, विहिरीतून उपसावे आणि सकाळी व दिवसा गावाला वितरित करावे. राज्यातील सर्व नगर पंचायती, नगर पालिका, महानगरपालिका, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, औद्योगिक कंपन्यांसह हाऊसिंग सोसायटीतील लोकांनी अशाच प्रकारे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करायला हवे.

रात्री वीज निर्मिती होवून वाया जाते. म्हणून असे करणे आवश्यक आहे. यातून शासनाचे 1,25,000 कोटी रुपये वाचतील. यातूनच पुढे पूर नियंत्रण (Flood control) आणि दुष्काळ निवारण (Drought relief) सहज साध्य करता येईल. आपल्या महाराष्ट्रात जूनमध्ये पाऊस सुरू होतो. हा पाऊस 8 ते 15 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो. त्याच काळात शेतीतील माेटरपंप, घरे व कार्यालयातील एसी, कूलर, फॅन बंदच असतात. म्हणजे विजेचा तुटवडा नसतोच. याच विजेचा वापर करून ‘अडवलेले पाणी उडवून आणि फिरवून जिरवले तर फायदा होइल की नाही? जिथे पूर (Flood ) येतो, तेथील पाणी जिथे दुष्काळ पडतो, तिथे फिरवले तर जिरेलच ना!

✴️ पाणी फिरवायची अजून एक संकल्पना पाहू. बऱ्याच धरणातून धरण (Dam) भरल्यावर पाणी नदीत (River) सोडले जाते. त्यामुळे खालील गावात पुरामुळे दाणादाण उडते. हेच अतिरिक्त पाण्यातील काही भाग आधीच महिनाभर कॅनॉल (Canal) वाटे दूरवर फिरवून पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल काय?

✴️ महाराष्ट्रात 28,600 ग्रामपंचायती आहेत. एका ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा माेटरपंप 5 एचपी (Horse power) पकडला तरी 28,600×5=1,43,000 एचपी वीज (Electricity) वापर रात्रीला केला जाईल.

✴️ कल्पना करा की, याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतीचे एकूण वीज पंप किती एचपीचे असतील? अंदाजे 10 पट असावेत, असे गृहीत धरले तरी 14,30,000 एचपी होईल. महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांचे एकूण वीज पंप किती एचपीचे असतील?

✴️ वीज निर्मिती सतत होत असते. परंतु, विजेचा वापर एक सारखा नसतो. रात्री वीज वापर अतिशय अत्यल्प असतो. म्हणून सरकार काही ठिकाणी दिवसा भारनियमन करते अन् रात्री शेतकऱ्यांना वीजपुरवठा करते. वीज वापराची ही परिस्थिती कायम अशीच राहील.

✴️ त्यावर मात करण्यासाठी सरकार रात्रीच्या विजेचा पुनर्वापर करण्यासाठी पंप स्टोरेज योजना अंगीकारते. इन्व्हर्टर सारखी पंप स्टरेज योजना काम करत असते. महाराष्ट्रात आधीच काही ठिकाणी ही योजना चालू आहेत. काही ठिकाणी प्लॅनिंग चालू आहे. त्यासाठी लाखो कोटी रुपये वाया जातील. सरकारी खर्च वाचविणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

✴️ कशी असते पंप स्टोरेज योजना समजावून घेवूया. जिथे पंप स्टोरेज योजना असते, तिथे एका धरणाच्या खाली दुसरे धरण असते. वरच्या धरणातून पाणी बाहेर पडते, तेव्हा वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठविले जाते. रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याने ती वीज वापरून तेच पाणी वरच्या धरणात पंप केले जाते. ही प्रक्रिया रोज चालू असते. दिवसा पाणी वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठते आणि रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज वापर करून तेच पाणी वरच्या धरणात आणले जाते. जसे आपल्या घरातील इन्व्हर्टर काम करतो.

✴️ महत्त्वाची गंमत म्हणजे, या पंप स्टोरेज योजनेतून विजेचा 45 टक्के नाश होतो. परंतु, 100 टक्के नाश होण्यापेक्षा 45 टक्के नाश बरा म्हणून पंप स्टोरेज योजनेचे गणित मांडले जाते.

✴️ अब्जावधी रुपये खर्च करून पाणी वर खाली करत बसण्यापेक्षा आपणच पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी रात्री पाणी वर नेवून ठेवले आणि दिवसा लागेल तसे वापरले तर आपलेच पैसे वाचतील. कारण सरकार पण आपलेच आहे आणि त्यातून विजेचा शून्य टक्के नाश होतो. आहे की नाही मज्जा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!