krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Child care scheme : बालसंगोपन योजना : एकल पालकांच्या मुलांना मिळतात दरमाह 2,250 रुपये

1 min read
Child care scheme : बालसंगोपन योजनेत (Child care scheme) आजपासून (1 एप्रिल 2023) मुलांना दर महिन्याला 2,250 रुपये मिळणार आहेत. बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते. या योजनेत कालपर्यंत (31 मार्च) 1,100 रुपये मिळत होते. ते 1 एप्रिल 2023 पासून 2,250 रुपये करण्यात आले आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

🌐 या योजनेचा लाभ कुणाला मिळताे?
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही (HIV) बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना या याेजनेचा लाभ मिळताे.

🌐 वयाची अट काय आहे?
अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानांही प्रत्येकी 2,250 रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.

🌐 उत्पन्न अट किती आहे?
पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

🌐 घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना लाभ मिळतो का?
होय, कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा, तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.

🌐 अर्ज घेवून कोठे जावे?
अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या गावी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा. बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते. सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे, त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.

🌐 या अर्जाला कोणती कागदपत्र जोडावी?
याचा छापील अर्ज कुटूंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा.
🔆 योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज.
🔆 पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेराॅक्स.
🔆 मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट.
🔆 तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
🔆 पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला.
🔆 पालकाचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा)
🔆 मुलांचे बॅंक पासबूक झेराॅक्स व ते नसल्यास पालकांचे पासबूक.
🔆 मृत्यूचा अहवाल. – (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)
🔆 रेशनकार्ड झेराॅक्स.
🔆 घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. 4 बाय 6 फोटो, पोस्टकार्ड मापाचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो)
🔆 मुलांचे 3 पासपोर्ट फोटो

❇️ दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते, हे लक्षात ठेवावे.
❇️ आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला 4,500 रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील.

❇️ हेरंब कुलकर्णी
राज्य निमंत्रक
साऊ एकल महिला समिती

❇️ फॉर्म भरताना अडचण आली तर आमचे अभ्यासू सहकारी मुकुंद टंकसाळे यांना फोन करावा. फक्त फॉर्म अडचणी विचाराव्यात. फोन – 9665515829

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!