krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कापसाच्या दरात घसरण सुरू; सूत गिरणी मालक अडचणीत

1 min read
महिनाभरापासून कापसाचे दर हळूहळू कमी हाेत आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील सुताच्या दरात घसरण व्हायला सुरुवात झाली. मे-2022 च्या शेवटच्या आठवड्यात सुताचे दर प्रति किलाे 40 ते ४45 रुपयांनी वाढले हाेते. या वाढीव दराबाबत दक्षिण भारतातील कापड उद्याेगांनी नाराजी व्यक्त केली हाेती. काहींनी सूत खरेदी बंद केल्याने सूत गिरणी मालकांना सुताचे उत्पादन 50 ते 60 टक्क्यांवर आणावे लागले हाेते. आता कापसाचे दर कमी हाेत असल्याने सुताच्या दरात प्रति किलाे 3 ते 15 रुपयांची कमी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतातील गिरणी मालक अडचणीत आले आहेत.

✳️ सुताची खरेदी प्रभावित
जून 2022 च्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र व दक्षिण भारतात कापसाच्या धाग्याचे दर प्रति किलाे 12 रुपयांपर्यंत कमी झाले हाेते. हे दर आणखी कमी हाेण्याचा अंदाजही व्यक्त केला जात हाेता. त्यामुळे बहुतांश खरेदीदारांनी सुताची खरेदी तात्पुरती थांबविल्याने सूत गिरणी मालकांची चिंता वाढली हाेती. सुताचे दर स्थिर झाल्यानंतर बाजारात सुधारणा हाेईल व खरेदीचा वेग वाढेल, असा अंदाजही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला. परिणामी, खरेदीदारांना या व्यवहारात ताेटा हाेण्याची भीती वाटत असली तरी काही नफा कमावण्यासाठी हालचाली सुरू केल्या हाेत्या. ही सुताच्या दरातील माेठी घसरण आहे. त्यामुळे सूत उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण हाेणे स्वाभाविक आहे. हे दर स्थिर झाले तरच सूत खरेदीला वेग येऊ शकताे.

✳️ असे आहेत सुताचे दर
खरेदी मंदावल्याने दक्षिण भारतातील बाजारपेठेत सुताच्या किमती प्रति किलाे 3 ते 12 रुपयांनी घसरल्या हाेत्या. दक्षिण भारतात 30 काउंट कॉम्बेड कॉटन यार्नची विक्री 390 ते 395 रुपये प्रति किलो (GST अतिरिक्त), 34 काउंट कॉम्बेड काॅटन यार्न 407 ते 412 रुपये प्रति किलो आणि 40 काउंट कॉम्बेड काॅटन यार्नची विक्री 415 ते 420 प्रति किलो दराने सुरू हाेती. 30 काउंट कार्डेड कॉटन यार्नचे दर 350 ते 353 रुपये प्रति किलो, 34 काउंट कार्डेड कॉटन यार्न 355 ते 358 रुपये प्रति किलो आणि 40 काउंट कार्डेड काॅटन यार्नचे दर 360 ते 362 रुपये प्रति किलो हाेते.

✳️ महाराष्ट्रात 3 ते 8 रुपयांची घसरण
दक्षिण भारतासाेबतच महाराष्ट्रातही सुताच्या दरात प्रति किलाे 3 ते 8 रुपयांची घसरण झाली. आर्थिक नुकसान हाेणे व वाढण्याची भीतीपाेटी खरेदीदार सूत नव्याने सूत खरेदी करायला अनिच्छुक असल्याचे जाणकार सांगतात. मुंबई बाजारपेठेत, 60 काउंट कार्डेड कापूस धाग्याच्या ताण वाणाचे दर प्रति किलाे 386 ते 396 रुपये तर वेफ्ट वाणांचे दर प्रति किलाे 370 ते 380 रुपये (GST अतिरिक्त) हाेते. 44/46 काउंट कार्डेड कॉटन यार्न वार्प जातीचे दर प्रति किलाे 365 ते 370 रुपये, वेफ्ट जातीच्या 80 काउंट कार्डेड सुती धाग्याचे दर प्रति किलाे 418 ते 427 रुपये, ताण वाणाच्या 40 काउंट कार्डेड कॉटन यार्नचे दर प्रति किलाे 348 ते 355 रुपये तर वार्प जातीच्या 40 काउंट कॉम्बेड यार्नचे दर प्रति किलाे 402 ते 417 रुपये हाेते.

✳️ रुईचे दर उतरले
कापसाचे दर वाढल्याने काही सूत गिरणी मालकांनी कापसाच्या (रुई) गाठी खरेदी करण्यात फारसी उत्सुकता दाखविली नाही. नाेव्हेंबर 2022 मधील साैदे प्रति खंडी (356 किलाे) 77,000 रुपये दराने हाेत आहे. सध्या रुईची स्पाॅट खरेदी प्रति खंडी 93,000 ते 95,000 रुपये दराने सुरू असून काही दिवसांपूर्वी हेच दर प्रत खंडी 97,000 ते 99,000 रुपये हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!