krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon arrives in Kerala : मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?

1 min read

Monsoon arrives in Kerala : मान्सूनने (Monsoon) गुरुवारी (दि. 4 जून) संपूर्ण केरळ (Kerala) राज्य काबीज करीत तामिळनाडूच्या कन्याकुमारी, तिरुणवेल्ली, थूथुकुडी या जिल्ह्यात तर कर्नाटकच्या मंगळूर, उटी पर्यंतच्या भागात मजल मारली. निर्धारित तारखेपेक्षा तीन दिवस उशिराने देशाच्या मुख्य भू-भागावर मान्सूनने प्रवेश केला आहे.

📍 पुढील प्रवास
येत्या दाेन ते तीन दिवसात मान्सून कर्नाटक, तामिळनाडूचा भाग व संपूर्ण गोवा काबीज करत प्रथमत: महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या तरी परिस्थिती अनुकूल जाणवत आहे.

📍 महाराष्ट्रातील पूर्वमोसमी पाऊस
पुढील चार दिवस म्हणजे सोमवार (दि. 8 जून)पर्यंत मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रात झटक्याखाली वाहणारा वारा, विजांच्या गडगडाटसह पूर्वमोसमी (Pre-monsoon) अवकाळी (Unseasonal) पावसाची (Rain) शक्यता जाणवते.

📍 सध्याची अनुकूल परिस्थितीसाठीची प्रणाली
महाराष्ट्राकडे मान्सूनची वाटचाल व अंतर्गत भागात पूर्वमोसमी पावसासाठी सध्याची अनुकूल परिस्थितीसाठीची प्रणाली काेणती आहे, हे बघणे गरजेचे आहे. समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीपर्यंत मराठवाडा ते कोकण आणि गोवा पार करत थेट नैऋत्य अरबी समुद्रापर्यंत सध्या असलेला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा आस वरील घडामोडीस पूरक ठरू शकतो.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!