Cold : ओसरलेल्या थंडीचा जाेर पुन्हा वाढणार
1 min read
Cold : मंगळवार (दि. 20 जानेवारी) ते गुरुवार (दि. 22 जानेवारी)पर्यंतच्या तीन दिवसांत महाराष्ट्रात थंडी (Cold) कमी होवून केवळ आजच्या(गुरुवार)पुरतेच मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण जाणवेल. उद्या(शुक्रवार, दि. 23 जानेवारी)पासून पुन्हा थंडी जाणवेल. शुक्रवार (दि. 23 जानेवारी) ते सोमवार (दि. 26 जानेवारी) पर्यंतच्या चार दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी वाढण्याची शक्यता बळावली आहे.
🔆 थंडीचा चढ उतार कशामुळे?
उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळ काटा दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळकार चक्रीय वारा स्थिती आहे. त्याच्या शेवटच्या परिघात, बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 27 किलाेमीटर वेगाने येणाऱ्या वेगवान आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे कोकण व मध्य-महाराष्ट्रात गेले तीन दिवस दमट वातावरण निर्माण झाले होते आणि आज ढगाळलेले जाणवत हाेते. उद्या (दि. 23 जानेवारी) पासून वातावरणात सुधारणा होण्याच्या शक्यतेतून पुन्हा थंडी जाणवणार आहे.