Cold Subside : महाराष्ट्रात थंडीचा जाेर कमी हाेणार
1 min read
Cold Subside : सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी (Cold) बुधवार (दि. 19 नाेव्हेंबर)पासून पुढील 3 दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 21 नोव्हेंबर) (मार्गशीर्ष प्रतिपदा)पर्यंत अशीच जाणवणार असून, कडाक्याची थंडी मात्र केवळ एक दिवस जाणवू शकते. गुरुवार-शुक्रवारी (20-21 नोव्हेंबर) पहाटे 5 च्या किमान तापमानात वाढ होवून थंडी काहीशी कमी होईल. शनिवार ते शनिवार (दि. 22 ते 29 नोव्हेंबर) च्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात थंडी कमी (Subside) होण्याची शक्यता जाणवते.
🔆 तीव्र थंडीची लाट – ठिकाण, किमान तापमान (सरासरीच्या खाली)
जळगाव 8.1 (-6.7), जेऊर 8 (-6.5)
🔆 थंडीची लाट
नाशिक- 9.8 (-4.8), मालेगाव 9.8 (-5.3),
🔆 थंडीच्या लाटसदृश स्थिती
डहाणू 16.1 (-5.6), अहिल्यानगर- 9.4(-4.3), पुणे 11 (-4), मुंबई सांताक्रूझ 16.2 (-5), सातारा 11 (-5.1), छत्रपती संभाजीनगर 10.5 (-4.9), नांदेड 10.2 (-6), परभणी 11.2(-5.4), अमरावती 11.5 (-5.2), यवतमाळ 10.4 (-6.6), गोंदिया 10.4 (-5.4), वाशिम 10.6 (-4.6)
🔆 आज व उद्याच थंडी
सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, आज व उद्या म्हणजे गुरुवार-शुक्रवार (दि. 21-22 नोव्हेंबर) (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवू शकते. परवा शनिवार (दि. 23 नोव्हेंबर) पासून थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते.
🔆 आठवडाभर कशामुळे एकाएकी थंडी गायब होणार?
शनिवार दि. 22 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होवून सोमवार दि. 24 नोव्हेंबरला त्याचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता असून, ते तीव्र कमी दाब क्षेत्र आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टी मार्गे पश्चिम बंगालकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून उत्तर व ईशान्य दिशेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव होवून महाराष्ट्रात थंडी गायब होण्याची शक्यता जाणवते. तसेच याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नाही.
🔆 पावसाची शक्यता?
रविवार व सोमवार दि. 23 व 24 नोव्हेंबर या 2 दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहुन झालाच तर अगदीच किरकोळ अशा एक ते दीड सेमी, (10 ते 10 मिमी.) इतक्या पावसाची शक्यता जाणवते. महाराष्ट्रातील उर्वरित 30 जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता जाणवत नाही.