krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cold waves : जळगावात तीव्र तर नाशिक, यवतमाळ थंडीच्या लाटेकडे

1 min read

Cold waves : जळगावला बुधवारी (दि. 12 नाेव्हेंबर) पहाटे पाच वाजता 9.1 अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदवले असून, ते सरासरीपेक्षा 6.2 इतक्या अंश सेल्सियसने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट (Cold waves) अनुभवली गेली. जळगावचे दुपारी 3 चे कमाल तापमानही 29.8 अंश सेल्सियस इतके नोंदवून सरासरीच्या 3.7 अंश सेल्सियसने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्रीसाेबतच दिवसाही हुडहुडी जाणवली.

🌀 थंडीच्या लाटे सदृश स्थिती
महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, मालेगाव, बीड, यवतमाळ या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात बुधवारी (दि. 12 नाेव्हेंबर) थंडीच्या लाटे सदृश स्थिती अनुभवली गेली.

🌀 थंडीचे दिवस
बुधवारी (दि. 12 नाेव्हेंबर)पासून नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश मधील 26 जिल्ह्यांत पुढील चार दिवस म्हणजे शनिवार (दि. 15 नोव्हेंबर म्हणजेच लहान एकादशी, आळंदी यात्रा)पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!