krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cold wave : जेऊर, जळगावात थंडीची लाट, निवडक शहरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती

1 min read

Cold wave : उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे, थेट सोलापूर जिल्ह्यापर्यंत झेपावल्यामुळे आज (साेमवार, दि. 10 नाेव्हेंबर) जेऊर (ता. करमाळा, जिल्हा साेलापूर) येथे रविवार (दि. 11 नाेव्हेंबर)पेक्षा किमान तापमान घट होवून अतितीव्र थंडीची लाट (Cold wave) जाणवली. साेमवारी तेथील किमान तापमान 9 अंश सेल्सीयस पर्यंत घटले असून, ते सरासरीच्या 14 अंश सेल्सीयसने खाली आहे. तेथील सकाळी नोंदली गेलेली सापेक्ष आर्द्रता ही आज 56 टक्के असून, ती तेथील अतिकोरडे वातावरण दर्शवत आहे.

📍 थंडीची लाट
जळगाव शहरात आज (साेमवार, दि. 10 नाेव्हेंबर) पुन्हा रविवार (दि. 11 नाेव्हेंबर)पेक्षा तापमानात घसरण होवून 9.4 अंश सेल्सीयस इतके किमान तापमान नोंदवले असून, ते सरासरीच्या 6.4 अंश सेल्सीयसने खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. जळगावचे साेमवारचे दुपारी 3 वाजताचे कमाल तापमानही 29.8 अंश सेल्सीयस नोंदवले गेले असून, ते सरासरीच्या 3.7 अंश सेल्सीयसने खालावलेले आहे. जेऊरला रविवारी (दि. 9 नाेव्हेंबर) 10 अंश सेल्सीयस इतके किमान तापमान नोंदवून तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा जवळपास पाच डिग्रीने खालावलेले आहे. जेऊरचे कमाल तापमानही 31 अंश सेल्सीयस नोंदवून सरासरीच्या 2.1 अंश सेल्सीयसने हे तापमान खालावलेले आहे.

📍 थंडीच्या लाटेसदृश स्थिती
महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर, बीड, डहाणू, मोहोळ, नाशिक, नंदुरबार, नांदेड, सांगली या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात साेमवारी थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली. कोकणातील डहाणू येथेही रविवारी जवळपास काहीशी थंडीच्या लाटेसदृश स्थिती जाणवली.

📍 आता पुढील तीन दिवस थंडीचे
साेमवारपासून बुधवार (दि. 12 नोव्हेंबर)पर्यंतच्या तीन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, डहाणू व छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरून रात्री चांगल्याच थंडीची शक्यता जाणवते.

📍 उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता
रविवार (दि. 9 नाेव्हेंबर)पासून महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व उत्तर अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 2 ते 4 डिग्रीने तर विदर्भात 2 डिग्रीने किमान तापमान खालावून आठवडाभर म्हणजे शनिवार (दि. 15 नोव्हेंबर)पर्यंत चांगल्या थंडीची शक्यता निर्माण झाली आहे.

📍 एका शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न
🔆 प्रश्न – अगोदर अहमदनगरला सर्वात कमी तापमान असायचे, नंतर निफाड, जळगाव, मग आता जेऊर कसे?
🔆 उत्तर – जेऊर हे करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातील गाव. अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर लागून असलेले गाव असून, त्याची भौगोलिक रचना जवळपास अहिल्यानगर शहरासारखीच आहे. रविवारला सकाळी 08:30 वाजता हवामान घटकांच्या निरीक्षणाची नोंद करतांना महाराष्ट्रात सगळ्यात कमी सापेक्ष आर्द्रता जेऊरला 57 टक्के नोंदवली गेली आहे. परभणीला 53 टक्के नोंदवली गेली आहे. सापेक्ष आर्द्रता हवेत सामावलेले पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील कोरडेपणा दर्शवते. सध्या या तेथील कोरडेपणानेच तेथील पहाटे 5 चे किमान तापमान घटवले आहे.

🎯 सापेक्ष आर्द्रता = (हवेत प्रत्यक्षात असलेल्या पाण्याच्या वाफेचे वजन ÷ त्या हवेत जास्तीत जास्त पाण्याची वाफ सामावू शकते, तिचे वजन ) X 100 %

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!