Names for cyclones : चक्रीवादळाला नावे कशी देतात?
1 min read
Names for cyclones : भारतीय उत्तर महासागरीय क्षेत्रात म्हणजे विषुवृत्तच्या उत्तरेकडील असलेल्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात तयार होणारी उष्णकटीबंधीय (Tropical) चक्रीवादळांनाच (Cyclone) नावे दिली जातात. ही नावे (Names) या समुद्र सभोवताली असलेले पण जागतिक हवामान संघटनेचे (World Meteorological Organization) सदस्य असलेल्या देशांकडून सुचवली जातात.
या सभोवतालच्या 13 देशांची नावे ‘अल्फबेट’ नुसार पुढीलप्रमाणे आहेत. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी-अरबस्तान, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात व येमेन अशा 13 आशियाई देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रादेशिक भाषेत चक्रीवादळ संबंधी सुचवलेली नावे व बनवलेली यादीनुसार अनुक्रमानुसार चक्रीवादळाला विशिष्ट नाव दिले जाते.
इंग्रजी अल्फाबेटनुसार 13 देशांची नावे एका खाली एक पहिल्या कॉलममध्ये लिहिली जातात. तर प्रत्येक देशाने सुचवलेली नावे त्या त्या देशासमोर एका रेषेत लिहिली जातात. आता आलेल्या चक्रीवादळासाठी थायलंड देशाने सुचवलेले ‘मोंथा’ (Montha) नाव दिले आहे. मोंथाचा ‘थाई’ भाषेतील अर्थ म्हणजे ‘सुवासिक फुल’ होय. यापूर्वीच्या चक्रीवादळाला श्रीलंकेने सुचवलेले ‘शक्ती’ नाव दिले होते. मोंथानंतर येणाऱ्या चक्रीवादळाला संयुक्त अरब अमिरात देशाने सुचवलेले ‘सेन-यार’ म्हणजे ‘सिंह’ असा अर्थ असलेले नाव दिले जाईल.