krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Return monsoon : खोळंबलेला मान्सूनचा परतीच्या प्रवासाला पुनरारंभ

1 min read

Return monsoon : गेल्या 15 दिवसांपासून एकाच जागेवर खिळलेल्या मान्सूनने (Monsoon) आज (शुक्रवार, दि. 10 ऑक्टाेबर) परतीच्या (Return) प्रवासाला सुरुवात करून महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे. त्याची आजची सीमा रेषा कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व विदर्भातील अकोला तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, उत्तर प्रदेशातील वाराणसी व बिहारमधील रक्सौल शहरातून जात आहे.

दरवर्षी 5 ऑक्टोबरला खान्देशात प्रवेश करणारा परतीचा मान्सून ह्यावर्षी 10 ऑक्टोबरला प्रवेश करीत असून, येत्या 3-4 दिवसांदरम्यान तो महाराष्ट्राबाहेर पडण्याची वातावरणीय शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून देशातून सरासरी 15 ऑक्टोबरला बाहेर पडण्याची शक्यताही जाणवते.

🔆 रब्बी हंगामावर काय परिणाम जाणवेल?
मान्सून वेळेत परतल्यामुळेच रब्बी हंगामाच्या पुढील सहा महिन्यासाठी निसर्गत: परंपरेने आतापर्यंत चालत आलेल्या वातावरणीय घटना, म्हणजे थंडी. बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी अशी होणारे चक्रीवादळे, सरासरी वारंवारेते प्रमाणे हंगामात तयार होणाऱ्या त्या चक्रीवादळांची संख्या, 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत होणारी पण कमी प्रमाणातील गारपीट, तसेच माफक असे धुक्याचे प्रमाण, थंडीत पडणारे भू-दवीकरण पण कमी प्रमाणात होणारे कमी बादड, प्रमाणातच पडणारे भू-स्फटिकिकरण (हिवाळ्यात बर्फाचा चुरा पडणे), शिवाय वेळेतच पुन्हा ईशान्य मान्सूनचे निर्गमन होणे इत्यादी वातावरणीय घटना जाणवतात. मार्च-एप्रिल 2026 पर्यंत सुयोग्य असे वातावरणीय बदल शेतीसाठी घडवून आणतील, असे वाटते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!