Heavy rain forecast : उद्यापासून दसऱ्यापर्यंत जोरदार पाऊस
1 min read
Heavy rain forecast : मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या (शनिवारी 27 सप्टेंबर) सकाळपर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतराची व चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमणाची शक्यता आहे. या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे शनिवार (दि. 27 सप्टेंबर)पासून दसऱ्यापर्यंतच्या सहा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता (forecast) निर्माण झाली आहे.
📍 अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा
🔆 शनिवार, दि. 27 सप्टेंबर – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर आणि नांदेड.
🔆 रविवार, दि. 28 सप्टेंबर – मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
🔆 सोमवार व मंगळवार, दि. 29 व 30 सप्टेंबर – मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा
📍 उघडीपीची शक्यता
🔆 शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबरपासून पूर्णतः नव्हे, परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.
📍 नद्यांच्या खोऱ्यातील जलआवक व धरण जलसंचय – सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.