Monsoon rain forecast : मान्सून महाराष्ट्रात ऑक्टोबरपर्यंत लटकणार
1 min read
Monsoon rain forecast : रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मान्सूनने (Monsoon) पश्चिम राजस्थानच्या काही भागातून त्याच्या सामान्य वेळापत्रकापूर्वीच माघार घेतली आहे तसेच राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये आणखी माघार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भावर सरकले आहे, ज्यामुळे समुद्रसपाटीपासून 4.5 किमी उंचीवर चक्राकार वारे पसरले आहेत. ही प्रणाली पश्चिम-वायव्येकडे आणि नंतर जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची अपेक्षा आहे.
बांगलादेश, आसाम, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रासह विविध प्रदेशांमध्ये अनेक इतर वरच्या हवेतील चक्राकार अभिसरण आणि ट्रफ रेषा नोंदवल्या गेल्या आहेत, तर काही कमी स्पष्ट होत आहेत. कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित एक ट्रफ रेषा तेलंगणा आणि विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक ओलांडून दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यापर्यंत पसरलेली आहे. पुढेही लाणींना आणि निगेटिव्ह IOD (Indian Ocean Dipole) इंडेक्समुळे असमान वितरण बघायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 कमी दाब एकामागोमाग बनतील अनुक्रमे 22 आणि 26 सप्टेंबर (प्रभावी) रोजी त्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता राहील.
🌀 साप्ताहिक अंदाज
📍 विदर्भ
🔆 17-19 सप्टेंबर :- संपूर्ण विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघ गर्जनेसह दुपारनंतर मध्यम पावसाची शक्यता.
🔆 19-24 सप्टेंबर :- सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरण, धुई धुक्याचं प्रमाण वाढणार, पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील.
📍 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र
🔆 17-24 सप्टेंबर :- पाऊस विखुरलेल्या स्वरूपात, धुईच प्रमाण जास्त, ढगाळ आणि सूर्यप्रकाश वातावरण.
🔆 26 सप्टेंबर पासून कमी दाब प्रभावामुळे जोरदार पाऊस.
📍 उत्तर महाराष्ट्र
🔆 17-22 सप्टेंबर :- विखुरलेल्या स्वरूपात पाऊस, कमी प्रमाण.
🔆 सूचना :- 25-1 ऑक्टोबर दरम्यान जोरदार वादळी पाऊस शक्यता असल्याने कापणीला आलेल्या पिकांचे नियोजन कराल.