krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain forecast : पाऊस सप्टेंबर महिन्यात धुमाकूळ घालणार

1 min read

Rain forecast : सध्या MJO (Madden Julian Oscillation) हा 5 व्या फेजमध्ये असल्यामुळे एकामागोमाग कमी दाबाच्या क्षेत्रांच्या निर्मितीस चालना मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण सप्टेंबर महिनाभर पावसाची (Rain) शक्यता (forecast) निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे.

🔳 सध्याची भौगोलिक परिस्थिती
🔆 सरासरी समुद्रसपाटीवरील मान्सूनचा प्रवाह (ट्रफ) बिकानेरपासून, ग्वालियर, सतना, पुरी ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे.
वायव्य मध्य प्रदेश, ईशान्य राजस्थान आणि वायव्य बंगालच्या उपसागरासह अनेक वरच्या हवेतले चक्राकार वारे सक्रिय आहेत.
🔆 एक पश्चिमी विक्षोभ आणि एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पाकिस्तान व लगतच्या पंजाबवर आहे.
🔆 2 सप्टेंबर 2025 च्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीमुळे राज्यात पुन्हा चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे.

🔳 विदर्भ साप्ताहिक अंदाज
🔆 3 ते 6 सप्टेंबर : संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
पूर्व विदर्भ (यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया) तसेच पश्चिम विदर्भात (वाशीम, बुलढाणा) पूरस्थिती निर्माण होऊ शकते. विजा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
🔆 7 ते 10 सप्टेंबर : विखुरलेल्या स्वरूपात पाऊस, तसेच धुके व दवाचे प्रमाण जास्त राहील.

🔳 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र साप्ताहिक अंदाज
🔆 3 ते 6 सप्टेंबर : पूर्व मराठवाड्यात (नांदेड, हिंगोली, परभणी, जालना) पूरस्थिती निर्माण होऊ शकते. इतर ठिकाणी मध्यम पाऊस. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्यता कमी.

🔳 उत्तर-मध्य महाराष्ट्र साप्ताहिक अंदाज
🔆 3 ते 6 सप्टेंबर : नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर पुणे आणि जळगाव जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता.
🔆 पुढील कमी दाबाचे क्षेत्र 12 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात तयार होणार असून, पुन्हा पावसास अनुकूल वातावरण निर्माण होईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!