Rain forecast : राज्यात चार दिवस जोरदार पाऊस
1 min read
Rain forecast : माजी उष्णकटिबंधीय वादळ विफा (Wipha)चे अवशेष सध्या उत्तर म्यानमारमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. 24 जुलै) बंगालच्या उपसागरात (BOB) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे याला बळकटी मिळेल. परिणामी, शुक्रवार (दि. 25 जुलै) ते साेमवार (दि. 28 जुलै) या चार दिवस राज्यात सर्वदूर जाेरदार व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Rain forecast) निर्माण झाली आहे.
✅ अपेक्षित मार्ग आणि तीव्रता
🔆 गुरुवारी (दि. 24 जुलै) वायव्य बंगालच्या उपसागरात (BOB) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहॆ.
🔆 पुढील 24 तास (शुक्रवार, दि. 25 जुलै) कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन पश्चिम-वायव्य दिशेने उत्तर ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.
🔆 आठवड्याचे शेवटचे दिवस (शनिवार, दि. 26 जुलै व रविवार, दि. 27 जुलै)ला हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन पश्चिम दिशेने पुढे सरकेल आणि मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातला प्रभावित करेल. ज्यामुळे पश्चिम आणि मध्य भारतात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
🔆 आठवड्याच्या शेवटी पुढे हे कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वी कमकुवत होईल.
🔆 या 28 जुलैपर्यंत पश्चिम आणि मध्य भारतात व्यापक स्वरुपात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात गुजरात, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, पूर्व राजस्थान आणि किनारी कर्नाटकात शनिवारी (दि. 26 जुलै) जोरदार ते अतिजोरदार पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण-पूर्व राजस्थान, मराठवाडा,विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात स्थानिक पूर आणि भूस्खलनाची शक्यता आहॆ.
✅ नवीन कमी दाबाचे क्षेत्र
पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम बंगालजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
✅ सामान्य सूचना
मच्छीमारांना आणि किनारी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २6 जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.