Rain forecast : राज्यात रेंगाळलेला पाऊस पुन्हा प्रगतीपथावर!
1 min read
Rain forecast : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील आठवड्यात दिलेल्या अंदाजानुसार (Rain forecast) शेतकरी मित्रांना बरीच उसंत मिळाली होती. आपली कामे उरकवण्यासाठी तर आता या आठवड्यात वातावरण कसे राहील ते बघूया.
🔆 भौगोलिक घडामोडी
मान्सूनचे कुंड (ट्रफ) सरासरी समुद्रसपाटीपासून आता अमृतसर, चंडीगड, बरेली, लखनौ, वाराणसी, रांची, दिघा आणि तेथून पूर्व आग्नेय ते ईशान्य बंगालच्या उपसागरातून जात आहे. पूर्व-पश्चिम कुंड (East-west offshore trough) अंदाजे 13° अंश बाजूने दक्षिण कर्नाटक ते दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशपर्यंत 5.8 किमी सरासरी समुद्रसपाटीपासून वर कायम आहे. 24 जुलै 2025 च्या सुमारास उत्तर बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यासर्व बाबींमुळे राज्यात पुन्हा चांगल्या पावसास (Rain) अनुकूल वातावरण तयार होईल.
🔆 विदर्भ
23-28 जुलै : संपूर्ण विदर्भात वादळी वारे ताशी 30-40 प्रतितास, गडगडाटसह चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भाचा जो उत्तरपूर्व भाग (अमरावती पूर्व,नागपूर, भंडारा, गोंदिया) आहे तिथे पावसाचं प्रमाण जास्त राहील, पूर परिस्थिती उद्भवू शकते. 29-30 जुलै : विदर्भात पाऊस कमी प्रमाणात (विरळ स्वरुपात) राहील.
🔆 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र
23-27 जुलै दरम्यान चांगला मध्यम पाऊस राहील. 28-30 जुलै कमी प्रमाणात विरळ स्वरुपात.
🔆 उत्तर महाराष्ट्र : 23-30 जुलै विखुरलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस. (23, 25, 29 जुलै बऱ्याच भागात)
🔆 प्रशासन अलर्ट : 23-26 जुलै उत्तर विदर्भ आणि पूर्व मराठवाडा पूर परिस्थिती राहू शकते. त्यामुळे काळजी घेणे जरुरी आहे.