krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton seeds misinformation : कापूस बियाण्यांबाबत सरकारने चुकीचा प्रचार करू नये

1 min read

Cotton seeds misinformation : माननीय श्री. माणिकरावजी कोकाटे,
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

विषय :- अमेरिका-ब्राझील देशात कापसाचे बीटी-7 (BT-7) तंत्रज्ञान वापरात आहे, असा चुकीचा प्रचार सरकारने कृपया करू नये.

सस्नेह नमस्कार,
देशाचे कृषिमंत्री मा. श्री. शिवराजसिंहजी चाैहान यांनी 11 जुलै 2025 ला कोयम्बतूर येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले बियाणे व देशाचे कापसाचे उत्पादन वाढावे यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काही सूचना करायच्या असतील तर एक नंबर 18001801551 दिला होता. या नंबरवर मी फोन केला, मराठीत मला सांगण्यात आलं की, आम्ही मंत्र्याना निरोप देऊ शकत नाही. मग हा नंबर का दिला होता? असाे!

या बैठकीतले आपले 15 मिनिटांचे भाषण मी ऐकले. आपण हे जाहीरपणे मान्य केले की, महाराष्ट्रात 50 टक्के काप‌साचा पेरा अनधिकृत (Illegal) HTBT चा आहे. शेतकऱ्यांना या बियाण्यांमुळे (Cotton seeds) फायदा होत असेल म्हणूनच ते चोरून या बियाण्यांचा वापर करीत आहेत. आपण केंद्र सरकारने या HTBT ला मान्यता द्यावी, ही विनंती कृषिमंत्री श्री. चौहान यांना केली. ही विनंती करताना आपण असे ही म्हणालात की, आपण बीटी-3 (BT-3) ला मान्यता देण्याचा विचार करतोय. पण अमेरिका-ब्राझील या देशात तर बीटी-7 (BT-7) पर्यंत तंत्रज्ञान वापराले जात आहे. अत्यंत नम्रपणे आपणास विनंती करतो की, असा चुकीचा प्रचार (Misinformation) सरकारच्या कार्यक्रमातून होऊ नये. HTBT बियाण्यांबद्दल काही शेतकरी संघटनांनी असा ही प्रचार केला की, हे तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळी (Pink Bollworm) साठी परिणामकारक आहे. हा प्रचार ही चुकीचा आहे.

आज बाजारात बीटी-2 (BG-II) चे व HTBT चे बियाणे F2 श्रेणीचे मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचा F1 बियाणे हवे असते. त्यांनी F1 व F2 याची ओळख कशी करावी? यासाठी आपण पुढा‌कार घेऊन एक मोठा मेळावा नागपूर किंवा अकाेला येथे आयोजित करावा, ही आग्रहाची विनंती.

धन्यवाद!
आपला विनम्र
विजय जावंधिया,
शेतकरी संघटना पाईक

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!