Kharif crops Sowing : देशात खरीप पिकांच्या पेरण्या 9.98 टक्क्यांनी वाढल्या
1 min read
Kharif crops Sowing : देशात 4 जुलै 2025 पर्यंत एकूण 437.43 लाख हेक्टरवर विविध खरीप पिकांची (Kharif crops) पेरणी (Sowing) करण्यात आली. सन 2024 च्या खरीप हंगामात 4 जुलैपर्यंत देशात 393.77 हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी करण्यात आल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरण्या 9.98 टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात 4 जुलैपर्यंत सरासरी 242 मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. हा पाऊस सामान्यपेक्षा 13 टक्के अधिक आहे. त्यामुळे देशभरात खरीप पिकांची पेरणी वेगाने सुरू आहे. वायव्य आणि मध्य भारतात सतत पाऊस पडत असल्याने काही भागात पेरणीवर परिणाम झाला आहे.
देशात धानाचे (Paddy) सरासरी पेरणीक्षेत्र 403.09 लाख हेक्टर असले तरी यावर्षी 4 जुलैपर्यंत 69.30 लाख हेक्टरमध्ये धानाची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 64.52 लाख हेक्टर असल्याने यावर्षी यात 6.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
डाळवर्गीय (Pulses) पिकांचे सरासरी क्षेत्र 129.61 लाख हेक्टर असून, 4 जुलैपर्यंत 42.57 लाख हेक्टरवर डाळवर्गीय पिकांची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 31.48 लाख हेक्टर असल्याने यावर्षी 26.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चांगल्या पावसामुळे डाळवर्गीय आणि तेलबियांच्या (Oilseeds) पेरणीला वेग आला आहे. देशात डाळवर्गीय पिकांचे सरासरी क्षेत्र 129.61 हेक्टर असले तरी 4 जुलैपर्यंत 42.57 लाख हेक्टरमध्ये विविध डाळवर्गीय पिकांची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 31.48 लाख हेक्टर असल्याने यावर्षी त्यात 26.03 टक्क्यांची वाढ झाली आहे. तुरीचे (Tur) पेरणी क्षेत्र घटले असून, 4 जुलैपर्यंत 16.47 लाख हेक्टरमध्ये तुरीची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 18.52 लाख हेक्टर होते. म्हणजेच तूर पेरणी क्षेत्र 12.51 टक्क्यांनी घटले आहे. 16.98 लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची (Moog) पेरणी झाली आहे. जी गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 60 टक्के अधिक आहे.
4 जुलैपर्यंत तेलबियांचे एकूण पेरणी क्षेत्र 108.21 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 12.30 टक्के अधिक आहे. देशभरात 79.04 लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची (Spybean) पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 4.53 टक्क्यांनी साेयाबीन पेरणी क्षेत्र वाढले आहे. भुईमुगाची 26.74 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत हे क्षेत्र 17.73 लाख हेक्टर एवढे हाेते. मक्याच्या पेरणी क्षेत्र 2 टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षी 4 जुलैपर्यंत 40.21 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली हाेती. यावर्षी 39.35 लाख हेक्टरवर मका पेरणी करण्यात आली आहे.
भरड धान्याची (Milets) पेरणी 17 टक्क्यांनी वाढून 77 लाख हेक्टरवर पाेहाेचली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 64 लाख हेक्टर होता. कापसाचे (Cotton) पेरणी क्षेत्र 79.54 लाख हेक्टरवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी 78.58 लाख हेक्टर हाेते. खरीप हंगामात उसाची लागवड 55 लाख हेक्टरवर करण्यात आली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत थाेडे वाढले आहे.
🔆 पीक – सरासरी क्षेत्र – 2025-26 – 2024-25 (लाख हेक्टर)
🔆 धान – 403.09 – 69.30 – 64.52 – 6.89 टक्के वाढ
🔆 डाळवर्गीय पिके – 129.61 – 42.57 – 31.48 – 26.03 टक्के वाढ
🔆 तूर – 44.71 – 16.47 – 18.52 – 12.51 टक्के घट
🔆 कुलथी – 1.72 – 0.09 – 0.07 – 28.42 टक्के वाढ
🔆 उडीद – 32.64 – 5.27 – 5.02 – 4.60 टक्के वाढ
🔆 मूग – 35.69 – 16.58 – 6.73 – 59.38 टक्के वाढ
🔆 इतर – 5.15 – 1.58 – 1.13 – 28.70 टक्के वाढ
🔆 मटकी – 9.70 – 2.59 – 0.01 – 99.53 टक्के वाढ
🔆 ज्वारी – 15.07 – 5.54 – 4.64 – 16.24 टक्के वाढ
🔆 बाजरी – 70.69 – 30.82 – 16.78 – 45.56 टक्के वाढ
🔆 रागी – 11.52 – 0.72 – 1.02 – 43.22 टक्के घट
🔆 मका – 78.95 – 39.35 – 40.21 – 2.19 टक्के घट
🔆 इतर – 4.48 – 0.76 – 1.14 – 48.95 टक्के घट
🔆 तेलबिया – 194.63 – 108.21 – 94.90 – 12.30 टक्के वाढ
🔆 भुईमूग – 45.10 – 26.74 – 17.73 – 33.71 टक्के वाढ
🔆 तीळ – 10.32 – 1.88 – 0.98 – 47.87 टक्के वाढ
🔆 सूर्यफूल – 1.29 – 0.46 – 0.45 – 3.39 टक्के वाढ
🔆 साेयाबीन – 127.19 – 79.04 – 75.46 – 4.53 टक्के वाढ
🔆 नायजरसीड – 1.08 – 0.01 – 0.19 – 24.19 टक्के घट
🔆 एरंडी – 9.65 – 0.08 – 0.09 – 20.13 टक्के घट
🔆 ऊस – 52.51 – 55.16 – 54.88 – 0.52 टक्के वाढ
🔆 ज्यूट – 6.19 – 5.32 – 5.43 – 1.92 टक्के घट
🔆 मेस्ता – 0.40 – 0.15 – 0.20 – 33.42 टक्के घट
🔆 कापूस – 129.50 – 79.54 – 78.58 – 1.21 टक्के वाढ
🔆 एकूण – 1096.65 – 437.43 – 393.77 – 9.98 टक्के वाढ
(सर्व आकडे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेले असून, हे पेरणीक्षेत्र 4 जुलै 2025 पर्यंतचे आहे.)