Rain forecast : बॅक टू बॅक कमीदाब विदर्भाला तारणार
1 min read
Rain forecast : एकामागोमाग एक कमी दाब शृंखला (Low pressure series) सुरू असल्याने आणि सध्या गंगा किनारा व पश्चिम बंगाल परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र 7 जुलै 2025 रोजी विकसित झाले होते, जे पुढील दाेन दिवसांत झारखंड आणि उत्तर छत्तीसगड ओलांडून हळूहळू पश्चिम वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.
मान्सून ट्रफ (कुंड) आता दक्षिण राजस्थानपासून गंगेच्या पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्राशी निगडित वरील चक्रीवादळापर्यंत आणि मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड दक्षिणेला लागून आहे. अरबी समुद्राजवळ ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान एक ऑफशोर ट्रफ असल्यामुळे या संपूर्ण भौगोलिक सिस्टीमचा फायदा संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस (Rain forecast) बरसण्यास मदत होतेय.
🔆 विदर्भ
7 जुलैपासून कमीदाबाच्या प्रभावमुळे संपूर्ण विदर्भात 11 जुलैपर्यंत दमदार पाऊस बघवयास मिळेल. 11 ते 14 जुलै दरम्यान विरळ स्वरुपात पाऊस सुरूच राहील. 14 ते 21 जुलै दरम्यान पावसाची उसंत राहील, जी शेतीची कामे करण्यास पुरेशी आहे. पुन्हा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या प्रभावमुळे 22 ते 28 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा जोरदार बरसणार आहे.
🔆 उर्वरित महाराष्ट्र
सध्याचा पाऊस मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्र विभागात 13 जुलैपर्यंत मर्यादित आहे. जो सार्वत्रिक नसून पिकांना जीवनदान देणारा राहील. 22 जुलैपर्यंत पावसात उघाड बघवयास मिळेल. उत्तर महाराष्ट्र विभागात पाऊस हा वरील विदर्भानुसार राहील.
🔆 तापमान आणी रोगराई
जुलैचा दुसरा आठवडा राज्यात अपुरा सूर्यप्रकाश असल्याकारणाने रात्रीला गारवा जाणवायला लागेल. त्यामुळे सर्दी, ताप, साथीचे रोग वाढेल.
🔆 शेतकरी मित्रांना संदेश
सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे कपाशी आणि मका पिकांवर करपा, सोयाबीनवर येल्लाे मोझ्याक, संत्रा फळपिकावर देठसुखीचा प्रादुर्भाव बघवयास मिळेल. त्यामुळे बुरशीनाशकांच्या फवारणीचे नियोजन असू द्या.