krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sugarcane price in Gujarat : ऊस दरात गुजरातच आघाडीवर

1 min read

Sugarcane price in Gujarat : यंदाही गुजरातच्या (Gujarat) सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणारे ऊस दर (Sugarcane price) देण्याचे जाहीर केले आहे. हे ऊस दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून आहेत. विशेष म्हणजे, गुजरात गेल्या 19 वर्षांची परंपरा सांभाळत याही हंगामाचा सर्वोच्च दर देत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने आजपर्यंत असे करू शकले नाहीत?.

♻️ गुजरातच्या बार्डोली येथील खेडूत समाज साखर कारखाना (10.94 टक्के रिकव्हरी)
नोव्हेंबर, डिसेंबर – 2024 व जानेवारी – 2025 मधल्याला – 3,502 रुपये, फेब्रुवारी – 2025 साठी 3,602 रुपये, मार्च – 2025 साठी 3,702 रुपये आणि एप्रिल – 2025 मध्ये गाळप उसाला प्रतिटन 3,802 रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे.

♻️ सायन येथील साखर कारखाना (10.47 टक्के रिकव्हरी)
नोव्हेंबर – 2024 ते जानेवारी – 2025 साठी 3,416 रुपये, फेब्रुवारी व मार्च – 2025 साठी 3,591 रुपये, तर एप्रिल – 2025 साठी 3,641 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहे.

♻️ कामरेज साखर कारखाना (10.65 टक्के रिकव्हरी)
नोव्हेंबर व डिसेंबर – 2024 आणि जानेवारी – 2025 साठी 3,481 रुपये, फेब्रुवारी – 2025 साठी 3,581 रुपये, मार्च – 2025 साठी 3,681 रुपये आणि एप्रिल – 2025 साठी 3,781 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत.

♻️ नर्मदा साखर कारखाना
नोव्हेंबर व डिसेंबर – 2024 तसेच जानेवारी, फेब्रुवारी – 2025 साठी 3,455 रुपये, मार्च – 2025 साठी 3,480 रुपये आणि एप्रिल – 2025 साठी 3,505 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत.

♻️ मढी साखर कारखाना (10.68 टक्के रिकव्हरी)
नोव्हेंबर व डिसेंबर – 2024 आणि जानेवारी – 2025 साठी 3,351 रुपये, फेब्रुवारी – 2025 साठी 3,401 रुपये आणि मार्च – 2025 साठी 3,501 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत.

♻️ महुवा साखर कारखाना (10.47 टक्के रिकव्हरी)
नोव्हेंबर व डिसेंबर – 2024 आणि जानेवारी – 2025 साठी 3,271 रुपये,
फेब्रुवारी – 2025 साठी 3,321 रुपये, मार्च – 2025 साठी 3,341 रुपये आणि एप्रिल – 2025 साठी 3,371 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत.

♻️ कॉपर साखर कारखाना (10.10 टक्के रिकव्हरी)
ऑक्टोबर – 2024 ते मार्च – 2025 मधील उसाचा प्रतिटन दर 3,157 रुपये समान ऊस दर दिला आहे.

♻️ गणदेवी येथील श्री सहकारी खांड उद्योग लिमिटेड
सर्वात जास्त गणदेवी येथील श्री सहकारी खांड उद्योग लिमिटेडने जाहीर करत 16 ते 30 एप्रिल – 2025 मधील गाळपास आलेल्या ऊसाला 3,851 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत. 1 ते 15 एप्रिल – 2025 साठी 3,801 रुपये तसेच नोव्हेंबर व डिसेंबर – 2024 आणि जानेवारी – 2025 साठी 3,551 रुपये, 1 ते 15 फेब्रुवारी – 2025 साठी 3,601 रुपये, 16 ते 28 फेब्रुवारी – 2025 साठी 3,651 रुपये, 1 ते 15 मार्च – 2025 साठी 3,701 रुपये आणि 16 ते 31 मार्च – 2025 साठी 3,751 रुपये प्रतिटन दर जाहीर केले आहेत.

♻️ असा सर्वोच्च दर देताना गणदेवीची रिकव्हरी 11.19 टक्के आहे. त्यांनी 8 लाख 96 हजार 312 टन उसाचे गाळप केले आहे.

🎯 दक्षिण महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गुजरातपेक्षा 12 ते 15 किलोने जास्त साखर उत्पादन असते. त्यांचे वाढीव 400 रुपये शेतकऱ्यांना देणे दूरच, गुजरात इतकाही दर दिला जात नाही. त्यामुळे ऊस दरात प्रतिटन एकूण 800 ते 1,000 रुपयांचा फरक पडतो. तेवढी लूट चालू आहे. त्यामुळे साखर सम्राट बनलेले नेते हे उत्तम उद्योजक नसून, शेतकऱ्यांना लुटणारे आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना चालकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडून देऊ नये.


🎯 आमची शेतकरी संघटना ऊस दर लुटीविरुद्ध लढा देणार आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!