krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon rain : विदर्भातील शेतकरी मित्रांनो, कामाला लागा!

1 min read

Monsoon rain : मागील आठवड्यात दिलेल्या अंदाजानुसार कमी दाबाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची (Monsoon) दुसरी शाखा ॲक्टिव्ह होऊन थबकलेल्या मान्सूनला गती मिळणार आहे. सध्या मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा ही मुंबईपासून, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी मधून पुढे जात आहे.

उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मूवर चक्रीवादळ (Cyclone) म्हणून पश्चिम विक्षोभ 3.1 किमी आणि 7.6 किमी दरम्यान समुद्रसपाटीपासून वर कायम आहे. हरियाणा आणि आसपासच्या प्रदेशात सरासरी समुद्रसपाटीपासून 1.5 किमीपर्यंत पसरलेले वरच्या हवेत चक्रीय स्थिती कायम आहे. ट्रफ लाईन (कुंड) ही सध्या पूर्व उत्तर प्रदेश ते ईशान्य आसाम, बिहार उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तसेच आसामच्या मध्यवर्ती भागात समुद्रसपाटीपासून 0.9 किमी वर कायम आहे. 10 जून रोजी बंगालच्या उपसागरावर एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, त्यामुळे कमकुवत असलेला मान्सून पुढे जाण्यासाठी मदत होईल. याचा परिणाम म्हणून राज्यात 12 जून ते 20 जून चांगल्या पावसाची (Rain) शक्यता राहील.

🌀 पावसाचे वातावरण
🔆 पश्चिम विदर्भ
पश्चिम विदर्भात 5 जून ते 7 जून दरम्यान बुलढाणा, वाशिम, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कमी वेळेतच जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हे वातावरण पुढे कमी दबावाच्या प्रभावाने 12 जूनपासून पेरणीलायक पाऊस पडायला सुरुवात होईल.

🔆 पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भात 7 जूनला नागपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस राहील तर 9 जूनपासून भाग वाढत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीकडून पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस 13 जूनपासून वाढत जाऊन धान शेतीला वरदान ठरेल.

🔆 उर्वरित महाराष्ट्र
उर्वरित राज्यात 12 जूनपासून पूर्व विदर्भाकडून सुरुवात होऊन मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र घेत 20 जूनपर्यंत चांगली प्रगती करत राज्यातील 60 टक्के पेरण्या उरकतील, असा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे कमी प्रमाण राहील.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!