Weather favorable for rain : महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल
1 min read
🔆 मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेच्या दक्षिणेकडे स्थलांतरीत.
🔆 अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर समुद्र सपाटीला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजे द्रोणीय आकारातील तटीय (ऑफ-शोर-ट्रफ – Offshore-Trough) आसाचे अस्तित्व कायम.
🔆 18 डिग्री अक्षवृत्त समांतर महाराष्ट्राच्या मध्यावरून जाणारा 3.1 ते 7.6 किमी उंचीवर हवेच्या साडेचार किमी जाडीत हवेचा कमी दाबाचा आस व त्यातून तयार झालेला वाऱ्यांचा शिअर झोन.
🔆 दक्षिण गुजरात क्षेत्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती.
या सर्व बाबी महाराष्ट्रातील पावसासाठी अनुकूल ठरल्या आहेत.
रविवार ( दि. 14 जुलै)पासून त्यापुढील चार दिवस म्हणजे गुरुवार (दि. 18 जुलै)पर्यंत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.
अजून पाच दिवस जावयाचे आहे. साेमवार (दि. 15 जुलै)पर्यंत बक्कळ ओलीवर अजूनही खरीपाच्या चांगल्या पेरण्या होऊ शकतात. बाठर ओलीवर केलेल्या अति-आगाप पेरण्या केवळ एमजेओच्या (MJO – Madden-Julian Oscillation) प्रणालीतून झालेल्या किरकोळ पावसामुळे कशाबशा सध्या तग धरून उभ्या असल्या तरी तो निर्णय अति-घाईचाच होता, असेही आज वाटते. त्यावेळी पेरीसंबंधी केलेले आवाहन खरे ठरू पाहत आहे.