krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Alert, Rain in Mumbai : रंगीत अलर्ट, मुंबईत तसा पाऊस आहे काय?

1 min read
Alert, Rain in Mumbai : गेल्या तीन आठवड्यांपासून म्हणजे 18 जूनपासून मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकण व गोव्यासाठी अतिजोरदार पाऊस (Heavy rain) पडावा, असेच वातावरण आजपर्यंत टिकून आहे. हे वातावरण जुलै अखेरपर्यंतही टिकून राहण्याची शक्यता आहे. या अतिजोरदार पावसाच्या शक्यतेबरोबर अधून-मधून कोकणासाठी कधी रेड तर कधी ऑरेंज असे अलर्ट दिले जात आहेत. रंगीत अलर्ट (Alert) म्हणजे मुंबईत हाहाकार माजवणारा पाऊस (Rain) होणार आहे काय? हे रंगीत अलर्ट म्हणजे अधिक तीव्रतेच्या पावसाचे सूचक आहेत काय? नेमका अर्थ काय?

रंगीत अलर्ट म्हणजे पावसाची अतितीव्रता असा सरळ अर्थ असू नये. पावसाबरोबर, ढगफुटी, महापूर, विजा पडणे, गारपीट होणे, छोटे छोटे तलाव फुटणे, शेतातील पिके वाहून जाणे, कच्ची घरे, इमारतींची पडझड होणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता या वातावरणामुळे असल्याने सावधानता बाळगणे किंवा प्रशासनाला नियोजनासाठी सूचना देण्यासाठी तसेच मानवी जीवित व वित्तहानीच्या धोक्यापासून बचावासाठी हे अलर्ट असतात. अतितीव्रतेच्या पावसासाठी वेगळी सूचक दर्शकता असते. विशेषतः मुंबईतील जनजीवन याचा अर्थ वेगळा काढते, यासाठीच हे स्पष्टीकरण केले आहे.

सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणातील मुंबईसह मुंबदत्रई उपनगर, ठाणे, पालघर येथे पाऊस तर होतोच आहे. परंतु, त्यापेक्षाही गोव्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील काही भागात किती तरी अधिक तीव्रतेचा म्हणजे 15 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर इतका पाऊस सध्या होत आहे. 12 जुलैपासून उत्तर कोकणातील जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता जाणवते.

अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर अशा अंदाजे 1,500 किमी लांबीची व समुद्र सपाटीपासून साधारण दीड किंवा त्यापेक्षा अधिक उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला ‘ऑफ-शोर-ट्रफ’ (Off-Shore-Trough) म्हणतात. सध्या तेथे त्याच्या अस्तित्वामुळे सध्या कोकण व घाटमाथा येथे जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मध्यम पाऊस होत आहे.

परंतु, सध्याच्या एन्सोच्या तटस्थ काळात दक्षिण गोलार्धातील हवेच्या उच्च दाबाचा ‘मस्करीन हाय’ (Mascarene High) हा त्याच्या सरासरी दाबापेक्षा गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिकच आहे. विशेषतः कमीच आहे. हीच स्थिती मजबूत नसल्यामुळे ताकदीने सह्याद्री ओलांडणाऱ्या मोसमी वाऱ्याचा अभाव जाणवत आहे. परिणामी खान्देश ते कोल्हापूर-सोलापूर पर्यंतच्या वर्षाच्छायेच्या प्रदेशात सध्या आपल्याला कमी पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!