krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Temperature : महाराष्ट्रातील तापमान कसे असेल?

1 min read
Temperature : मुंबईसह कोकणातील सात तसेच सांगली, कोल्हापूर व दक्षिण सातारा या 10 जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान (Minimum temperature) 16 डिग्री सेल्सिअसच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा दोन डिग्री सेल्सिअसने अधिक जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान 11 डिग्री सेल्सिअसच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा एक ते दीड डिग्री सेल्सिअसने अधिक जाणवत आहे. त्यातही विशेषतः विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान तर एकांकी म्हणजे 9 डिग्री सेल्सिअसच्या आसपासही जाऊ शकते. विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील थंडी देणाऱ्या या पहाटेच्या तापमानातील फरक हा सध्याच्या कालावधीत असलेल्या असमान हवेच्या दाबातील फरक यामुळे थंडीचे हे सातत्य टिकून आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

🔆 हवेचा वेग
सध्या महाराष्ट्रावर वारा शांत नाही. उत्तरेकडून महाराष्ट्रावर येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 12 किमी इतका आहे. त्यामुळे थंडी जाणवत आहे. शुक्रवार (दि. 22 डिसेंबर)पासून अजून एक नवीन पश्चिमी झंजावात उत्तर भारतात पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात आदळण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेमुळे डिसेंबरअखेर पर्यंत महाराष्ट्रात या थंडीची अपेक्षा करायला हरकत नाही.

🔆 दुपारचे कमाल तापमान
मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान 31 ते 32 डिग्री सेल्सिअस तर उर्वरित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात मात्र दुपारचे कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाणवत आहे. मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात हे तापमान सरासरीपेक्षा दीड डिग्री सेल्सिअसच्या आसपास तर उर्वरित 18 जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा चार डिग्री सेल्सिअसच्या आसपास कमी आहे. म्हणून तर दिवसाही चांगलीच थंडी जाणवत आहे, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!