Edible oil, Peanuts : गोष्ट गोडेतेलाची : शेंगदाणा तेल
1 min read🔆 शेंगदाणा तेलाचे गणित खालीलप्रमाणे
ठोक दर 80 ते 100 रुपये प्रति किलो.
तेल काढण्याची पद्धत कोणती यावर याचे गणित अवलंबून आहे.
ऑईल एक्सपेलर विथ रिफाईन (Oil expeller with refine).
तेलाची टक्केवारी (Oil percentage) 45 ते 50 टक्के.
समजा 100 किलो शेंगदाणे दर 8,000 रुपये.
45 किलो तेल = 49.5 लिटर.
55 किलो ढेप x 30 रुपये किलो = 1,650 रुपये.
8,000 – 1,650 = 6,350 रुपये.
6350/49.5 = 128.28 रुपये ही मूळ किंमत. यावर इतर खर्च जसे मनुष्यबळ, वीज, वाहतूक खर्च व त्यानंतर निर्मात्याचे प्रॉफिट. हे सर्व मिळून त्याची NRV 165 रुपयांपर्यंत जाते. यात रिफाईन करताना 6 ते 18 प्रकारचे रसायन वापरले जातात. हेंक्सिन हे विद्रावक पदार्थांचा वापर होतो. जो आरोग्यास फार हानिकारक आहे . तेलातील चिपचपापणा नाहीसा होतो. त्यातील सर्व अन्नद्रव्य नष्ट होतात. सुगंध रहित करतात. म्हणजे सरळ सरळ जो 165 रुपये किंवा कमीने विकतो, तो भेसळ करतो.
🔆 आता आपण लाकडी घाण्यावर शेंगदाणा तेलाचा हिशोब पाहू या…
1 किलो तेलासाठी लाकडी घाण्यावर 2.5 किलो शेंगदाणे पाहिजे. 40 टक्के तेल मिळते.
1 किलो तेल व
1.5 किलो ढेप × 30 = 45 रुपये.
सरासरी ठोक भाव 80 रुपये /किलो.
2.5 X 80 = 200 रुपये.
200 – 45 = 165 रुपये.
165 रुपये ही मूळ किंमत यावर इतर खर्च जसे मनुष्यबळ, वीज, वाहतूक खर्च व त्यानंतर निर्मात्याचे प्रॉफिट. हे सर्व मिळून त्याची NRV 210 रुपये.
हे वरील गणित जर शेंगदाणे ठोक भाव 80 रुपयांमध्ये मिळाले तर भाव वाढला तर त्या प्रमाणे उत्पादन खर्चात ही वाढ होईल.
🟢 हक्क तुमचा… निवड तुमची…