Palm oil & refined oil : गोष्ट गोडेतेलाची : पामतेल व रिफाईंड ऑइल
1 min read
रिफाईंड तेल (Refined oil) तयार करण्यासाठी पामतेलाचा ब्लेंडिंग (Blending) म्हणून सर्वात जास्त वापर केला जातो. पामतेलामध्ये आणि डालडामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो. जे मानवी शरीराला अत्यंत घातक आहे. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाईंड होतच नाही. सिंगल रिफाईंडसाठी 6 ते 7 प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. उदा. गॅसोलिन (Gasoline), सिंथेटिक अँटी ऑक्सीडंटस् (Synthetic antioxidants), हेक्सेन (Hexane) इत्यादी.
🔆 रिफाईंड तेलाचा वास येत नाही. कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन (Protein) शिल्लक राहत नाही.
🔆 रिफाईंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले फॅटी अॅसिड (Fatty acids) आधीच बाहेर काढले जातात.
🔆 रिफाईंड तेलामध्ये व्हिटामिन ‘ई’ (Vitamin E) आणि मिनरल्सही (Minerals) नसतात.
🔆 रिफाईंड तेल मानवी आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक असते. कारण त्यात वापरले जाणारे केमिकल्स मानवाच्या शरीरातील अवयवांना निकामी करतात. 🔆 रिफाईंड तेलात आपल्या शरीरातील आवश्यक असणारे एकही घटक नसतो. उलट केमिकलपासून बनवलेले हे तेल एक प्रकारे विष समान आहे.
🔆 रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीरात घातक असलेला घटक तयार होतो. त्याला एल.डी.एल. (LDL : Low-density lipoprotein) असे म्हणतात. ज्यामुळे ब्लॉकेजस् (Blockages) तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला हार्ट अटॅक (Heart attack) सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते.
🔆 रिफाईंड तेल खाल्ल्याने वात विकार असंतुलित राहतात. गंभीर आजार उद्धभवतात.
🔆 रिफाईंड तेलाची निर्मिती भारतात 30 वर्षापूर्वी झाली आणि जाहिरातींच्या माध्यमातून याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला. आज सगळे हेच रिफाईंड तेल खातोय. ज्याचा परिणाम म्हणजे घराघरात आज लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय.
🔆 खरं तर तेलाला रिफाईंड करताना सुरुवातीला 300°C आणि दुसर्यांना 464°C इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते.
🔆 तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही.
🔆 डबल रिफाईंड आणि ट्रिपल रिफाईंड करताना तर हे तेल दोनदा आणि तीनदा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात. म्हणजे मेलेलं तेल खातोय आपण.
तेव्हा जवळचा तेलाचा घाणा बघा आणि पूर्वी ज्याप्रमाणे तेल काढून वापरायचो तसं तेल खाणं सुरू करा. जे कडक उपवास करतात ते खनिज मीठ वापरतात. त्यांनी तळण्यासाठी चुकनही रिफाईंड तेल वापरू नये.
🟢 हक्क तुमचा, निर्णय तुमचा…!