krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Unseasonal Rain : विदर्भ, खानदेशात अवकाळी पावसाचा जाेर कायम

1 min read
Unseasonal Rain : विदर्भ व खानदेशात गारपिटीची शक्यता नसली तरी अवकाळी (Unseasonal) पावसाचा (Rain) जाेर कायम आहे. मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) विदर्भातील 11 व खानदेशातील नंदुरबार, धुळे व जळगाव या तीन अशा 14 जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या तर काही भागात गारपीटही (Hail) झाले. या भागात अवकाळी पावसाचा जाेर आगामी काही दिवस कायम राहणार असून, गारपिटीची शक्यता नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

कोकण वगळता मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही कायम आहे. बुधवार (दि. 29 नोव्हेंबर), गुरुवार (दि. 30 नोव्हेंबर) व शुक्रवार (दि. 1 डिसेंबर) या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह अगदीच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाच्या सरी काेसळण्याची शक्यता असून, गारपीटीची शक्यता नाही.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 29 जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4 डिग्री सेल्सिअसने घसरण जाणवत असून, दिवसाही गारवा जाणवणार आहे. शनिवार (दि. 2 डिसेंबर)पासून वातावरण पूर्णपणे निवळेल, असेही हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!