Rain and hail : गारपिटीची शक्यता मावळली, पाऊस मात्र कायम!
1 min read
🎯 हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते,
🔆 मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरुपात मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता जाणवते असून महाराष्ट्रात कुठेही गारपिटीची शक्यता जाणवत नाही.
🔆 बुधवार (दि. 29 नोव्हेंबर), गुरुवार (दि. 30 नोव्हेंबर) व शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे. मात्र, कुठेही गारपिटीची शक्यता नाही.
🔆 शनिवार (दि. 2 डिसेंबर)पासून प्रणाली विरळ होवून वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ते चक्रीवादळ बांगलादेश ब्रह्मदेशकडे मार्गस्थ होण्याच्या दाट शक्यता असल्याने त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम जाणवणार नाही.
🔆 बुधवार (दि. 29 नोव्हेंबर)पासून हळूहळू थंडीला सुरुवात हाेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
🔆 हवामान विभागानुसार पश्चिम बंगालच्या खाडीत आणि मध्य प्रदेशात मध्यम सायक्लाेनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation)तयार झाल्याने नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स(Western Disturbance)मुळे वातावरण बदलले आहे.
🔆 विदर्भातील सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकाेला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपुरात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वाशिममध्ये सर्वाधिक 66 मि.मी., बुलढाणा येथे 61 मि.मी., अकाेला 44.8 मि.मी., चंद्रपूर 31 मि.मी., यवतमाळ 29 मि.मी. व अमरावतीत 28.4 मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. या सर्व जिल्ह्यांमधील पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे.