krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rain and Hail possibility : महाराष्ट्रातील काही भागात पावसासाेबतच गारपिटीचीही शक्यता

1 min read
Rain and Hail possibility : महाराष्ट्रात गुरुवार (दि. 23 नाेव्हेंबर)पासून पावसाळी वातावरण (Rainy weather) तयार झाले आहे. हे वातावरण पाच दिवस म्हणजेच साेमवार (दि. 27)पर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, रविवार (दि. 26 नाेव्हेंबर) व साेमवार (दि. 27 नाेव्हेंबर) या दाेन दिवसात राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहणार असून, तुरळक ठिकाणी गारपीट (Hail) होण्याची शक्यताही (possibility) नाकारता येत नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

बुधवार (दि. 29 नोव्हेंबर)पासून पावसाळी वातावरण निवळून त्यापुढील तीन आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात (Maximum temperature) घट जाणवेल. त्यामुळे दिवसाचा उबदारपणा कमी होवून दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. शुक्रवार (दि. 8 डिसेंबर)पासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून थंडीला (Cold) सुरुवात होवू शकते, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.

🎯 गारपिटीचा काळ नसतानाही, शक्यता का निर्माण झाली?
🔆 खरं तर गारपिटीचा काळ साधारणत: 26 जानेवारी ते 15 मार्चपर्यंतचा असताे. तरीदेखील खालील प्रणाल्यांमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यात दाेन दिवस तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्ठभागापासून दीड किमी उंचीच्या जाडीचा हवेच्या कमी दाबाच्या ‘आस’ निर्मितीमुळे या पाच जिल्ह्यात गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 वायव्य उत्तर भारतातून थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात 6 किमी उंचीच्या वर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणामामुळे या पाच जिल्ह्यात गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे.
🔆 तामिळनाडू, केरळ भू-भाग ओलांडून दीड ते दोन किमी उंचीपर्यंतची ‘पुरवी’ वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होवून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करीत आहे. वरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलिनीकरणामुळे प्रणाली क्रमांक एक व दाेनच्या संयोगातून या पाच जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वाढली आहे.

कृषिसाधना....

7 thoughts on “Rain and Hail possibility : महाराष्ट्रातील काही भागात पावसासाेबतच गारपिटीचीही शक्यता

  1. Wonderful items from you, man. I have have in mind your stuff prior to and you’re simply too excellent.
    I actually like what you’ve acquired right here, certainly like what you’re
    saying and the way in which through which you assert it.

    You are making it enjoyable and you continue to take care of to keep it smart.

    I can not wait to read much more from you. That is really a
    great site.

  2. We’re a group of volunteers and opening a new scheme
    in our community. Your site offered us with valuable information to work on.
    You have done a formidable job and our entire community will be grateful to you.

  3. The other day, while I was at work, my cousin stole my apple ipad and tested to see if
    it can survive a 25 foot drop, just so she can be a youtube sensation. My iPad is now broken and she has 83
    views. I know this is totally off topic but I had to share it with
    someone!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!