krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Heavy rain : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

1 min read
Heavy rain : येत्या दाेन दिवसात मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणे तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होवून वायव्येकडे भू-भागावर सरकणे या दोन प्रणालीमुळे मंगळवार (दि. 5 सप्टेंबर)पासूनच पुढील 10 दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 15 सप्टेंबर)पर्यंत महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह चांगल्या व मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

विशेषतः मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 अशा 18 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकणातील 11 आणि विदर्भातील 7 अशा 18 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत केवळ हिमालयाच्या पायथ्याशी रेंगाळणाऱ्या मान्सूनच्या आसाचे पूर्व टाेक येत्या दाेन दिवसात दक्षिण गतीने पूर्वमध्य बंगालच्या खाडीकडे सरकत आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेत असून, ते वायव्येकडे भू-भागावर सरकत आहे. साेबत येथील सायक्लाेनिक सर्क्युलेशन ट्रफ तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे जात आहे. या बदलामुळे 5 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात गडगडाट व चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार आणि मुंबई, काेकण व विदर्भात जाेरदार ते अतिजाेरदार पाऊस हाेऊ शकताे.

🔆 पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने (Department of Meteorology) चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यात 5 व 6 सप्टेंबर राेजी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. यासह नागपूर व वर्धा येथे 6 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. पश्चिम विदर्भात अमरावती व यवतमाळ येथे 6 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढचे तीन दिवस येल्लाे अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाला सुरुवात झाली. नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, वर्धा जिल्ह्यात जाेराचा पाऊस झाला तर गाेंदिया, भंडारात हलक्या सरी बरसल्या. साेमवारी दिवसभर चंद्रपूर वगळता सर्वत्र किरकाेळ हजेरी लागली असली तरी वातावरणात उकाडा कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!