krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer, Politics : ‘त्या’ एक टक्का जमातींना जागा दाखवा!

1 min read
Farmer, Politics : मित्रांनो, या जमाती एक टक्क्यापेक्षा कमी आहेत, ज्या त्यांचं कष्ट न करता पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतमालाला भाव मिळू देत नाहीत. चांगलं अनुदान मिळू देत नाहीत आणि कर्जमाफी होऊ देत नाहीत. त्या तीन जमाती आहेत. लुटारू कौटुंबिक उद्योग घराणे (स्टॉक मार्केटच्या इंडेक्स वरून सहज काढता येतील), प्रमुख राजकीय पक्ष आणि वरिष्ठ भ्रष्ट नोकरशहा जो सरकारचा पगार घेतो आणि फक्त या कौटुंबिक उद्योग घराण्यांसाठी काम करतो. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या एक टक्का जमातीला खरंच आपण यांची जागा दाखवू शकतो. यासाठी आपण बराचशा गोष्टी करू शकतो..

🌐 कौटुंबिक उद्योग घराण्यांना कायमचे संपवा
🔆 कौटुंबिक उद्योगाच्या कोणत्याच वस्तू विकत घेऊ नका. कार, लॅपटॉप, मोबाईल, चहा, मीठ…. ज्या पण 10-15 उद्योग घराण्यांच्या वस्तू आहेत, त्यांच्यावर बहिष्कार टाका, नाहीतरी त्या महागड्याच असतात आणि आपल्या नातेवाईकांना पण सांगा की, बहिष्कार टाका म्हणून.
🔆 कौटुंबिक उद्योगाचे जे इन्वेस्टर्स आहेत, म्हणजे यांच्या कंपन्यांचे स्टॉक घेणारे, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील (बँका, पेन्शन फंड, Sovereign फंड), रिटेल इन्व्हेस्टर सर्वांना सांगा की, यांच्यामुळे पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि तीन लाख आत्महत्येच्या वाटेवर आहेत, म्हणून यांचे शेअर्स विकून टाका. म्हणजे यांचे स्टॉक आपोआप खाली पडतील.
🔆 जगातल्या कुठल्याही कंपनीला यांच्या बरोबर पार्टनरशिप करू देऊ नका, ज्यांनी यांच्या बरोबर पार्टनरशिप केली आहे, तेवढ्यांन सांगा की, पार्टनरशिप तोडून टाका.
🔆 जे कामगार यांच्याशी काम करत असतील, त्यांना सांगा भले स्वतःचा व्यवसाय कर, नाहीतर दुसरी नोकरी शोध, पण यांच्या कंपनीमध्ये काम करू नकोस.
मित्रांनो, पुढच्या 4-5 महिन्यात या गोष्टीमध्ये जर आपल्याला यश आलं तर यातले सर्वच लुटारू कौटुंबिक उद्योग घराणे आयुष्यातून उठतील. जर नाही केलं तर संपूर्ण शेतकरी वर्गाला सरकार वर दबाव आणून येत्या काळात कायमस्वरुपी उठवतील.

🌐 राजकीय पक्षांना कायमच संपवा
🔆 इंग्रजांना संपवण्यासाठी काँग्रेस तयार झाली. स्वातंत्र्यानंतर तिची मालकी एका कुटुंबाकडे गेली. काँग्रेस संपण्यासाठी तयार झालेली भाजप कालांतराने दोघा तिघांच्या हातातली बाहुली बनत चालली आहे. भविष्यात नवीन पक्ष काढला तरी कालांतराने तीच अवस्था होणार आहे. कारण हे कौटुंबिक उद्योग घराणे प्रमुख नेत्यांना सत्ता आली का manage करून घेतात. खासकरून second generation leadership ला. म्हणून राजकीय पक्ष न काढता संघटनेला गुरू मानून संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष लढा. गणपतराव देशमुख, बुलढाण्याचे रविकांत तुपकर, भोकरदनचे नारायण लोखंडे, कोकणातला सत्यजित चव्हाण तरुणांसाठी सर्वात चांगले उदहारण आहेत. कौटुंबिक उद्योग घराण्याला प्रत्येक अपक्ष निवडून आलेला नेता manage करणं अशक्य आहे.
🔆 अपक्ष निवडून आल्यामुळे बिनधास्तपणे विधिमंडळात, संसदेत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडता येतील. लोकप्रतिनिधी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळे संघटना अजून मजबूत होईल आणि ही राजकीय पक्षांची जमत कायमची संपेल.

🌐 भ्रष्ट नोकरशहा
🔆 नाशिकच्या जितेंद्र भावेंसारखा जो पण भराष्टाचारी सापडेल, त्याच्यावर तुटून पडा. याच महिन्याच्या सुरुवातीला एक तहसीलदार लाच घेताना सापडला, तर जितेंद्र भावेंनी तो राहत असलेल्या सोसायटीत जाऊन त्याची अटक असलेल्या बातमीच्या पेपरचे अंकवाटप केलं आणि उरली सुरलेली त्याची नातेवाईक आणि मित्रांमध्ये असलेली इज्जत पण संपवली. लाच घेऊन जीवन असह्य होईल, ह्याची जेव्हा जाणीव होईल, तेव्हाच हा भ्रष्ट नोकरशहा लाच घेणं थांबवेल.

मित्रांनो, हा खरंच चुकीचा गैरसमज आहे की, शेतमालाचे भाव पाडून सरकार शहरी मतदाराला खुश करतात. खरतर शेतमालाचे भाव पाडून सरकार या कौटुंबिक उद्योग घराण्याच्या वस्तू महाग दरात विकायला प्रोत्साहन देत आणि त्यांना वाचवत आणि बदल्यात सर्वच राजकीय पक्षांना टक्केवारी मिळते.वीज महागली, कार महागली म्हणून कुठलाच राजकीय पक्ष तक्रार करत नाही. पण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की, सर्वच तुटून पडतात.

या संपूर्ण वर्षात यांनी कापूस आयात करून कापसाचे भाव पाडले. खाण्यायोग्य नसलेले पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले. टोमॅटो आयात करून टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले. यामुळे मागच्या शंभर दिवसात 1,700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यांच्या लहान मुलांनी सुद्धा शिक्षणासाठी वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली. तिकडे या कौटुंबिक उद्योग घराण्याच्या उद्योग असलेल्या बहुतांश ठिकाणी SEZ तयार करून शून्य कर आणि शून्य निर्यात शुल्क सरकारने घोषित केलं आहे आणि वरून फुकटात जमीन आणि वीज सुद्धा.

सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, कोणीही घाबरू नका. आत्महत्येचा विचार तर डोक्यातूनच काढून टाका. आता फक्त संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आरपारची लडाई लढा. ज्या पोलीस आणि सैन्य दलाच्या बळावर ही जमात उड्या मारत आहे, त्यांना माहीत नाही की, पोलीस आणि सैन्य दलात काम करणारी 90 टक्के पोरं आपल्या ग्रामीण भागातली आहेत. त्यांना पण आता माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांचं उदाहरण देऊन सांगा की, एक लाख शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी IAS पदाचा राजीनामा दिला आणि तुम्ही पण शेतकरी वाचवण्यासाठी राजीनामा द्यायला तयार रहा. संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा सत्ता येईल, तेव्हा व्याजासहित तुझा सगळा पगार परत करू म्हणा आणि वरून डबल प्रोमोशन सुद्धा.

मित्रांनो, फक्त लढा खर सांगतो, ही जमात चार पाच महिन्यात नांग्या टाकून देईल. तुमची आताची पिढी फक्त शहरातच नाही तर जग भर पसरलेली आहे, त्याच्यामुळे ही एक टक्का जमात सोडली तर सर्वांकडून म्हणजे जगभरातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटेल. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!