Rain forecast : कोकण, विदर्भात जाेरदार तर इतर भागात मध्यम पावसाची शक्यता!
1 min read✳️ कोकणातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे शुक्रवार (दि. 18 ऑगस्ट) ते शुक्रवार (दि. 25 ऑगस्ट) या काळात जोरदार तर बुलढाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात मध्यम व मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
✳️ मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यात शुक्रवार ( दि. 18 ऑगस्ट) व शनिवार (दि. 19 ऑगस्ट) या दाेन दिवसात मुसळधार तर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
✳️ मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे दि. 18 ते 25 ऑगस्ट दरम्यान ढगाळ वातावरण राहिल. काही भागत अगदीच मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
✳️ सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, धरण जलसंवर्धन क्षेत्रातून आवक मंदावली आहे. त्यामुळे धरण जलवाढ टक्केवारी मर्यादित झाली आहे. तरी देखील नाशिक व पुणे शहर पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस चांगल्या पावसाची शक्यता जाणवते.
✳️ मान्सूनचा आस हिमालय पायथ्याशीच स्थिरावल्यामुळे पावसाचा खण्ड कायम जाणवत आहे. सन 1972 नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खण्ड समजावा.
✳️ 21 ऑगस्टनंतर बंगाल उपसागरात पुन्हा जर एखादी वातावरणीय प्रणालीची निर्मिती व तिचे मध्य भारतात (उत्तर छत्तीसगड दरम्यान) वायव्य दिशेने होणारे स्थलांतरण व परिणामकारक प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढे पाऊस होवू शकतो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातील परिस्थिती वातावरणीय ताज्या घडामोडीनुसार कळवली जाईल. येणाऱ्या कालावधीसाठी सध्या हेच पावसासंबंधीचे वास्तव जाणवत आहे.