krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Below average rain : ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

1 min read
Below average rain : यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस (Below average rain) पडला. त्यामुळे खरीप पेरण्या (sowing) खाेळंबल्या हाेत्या. जुलैमध्ये काही भागात पावसाने सरासरी ओलांडली तर काही भागात जाेरदार व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटाेपत्या घेतल्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी तर देशात सरासरी एवढा पाऊस हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बऱ्यापैकी पेरण्याही झाल्या नाहीत.

✴️ जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाने सरासरी भरून काढण्यासाठी मदत केली.
✴️ आता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
✴️ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरी एवढ्याच पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
✴️ ऑगस्ट महिन्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. (94 टक्क्यांपेक्षा कमी) (ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 254.9 मिमी आहे.)


✴️ येत्या दोन महिन्यांत कमाल व किमान तापमानातही वाढीचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या नकाशातील पांढऱ्या रंगात दर्शविलेल्या भागात हवामान बदलाचा परिणाम अपेक्षित आहे.
✴️ भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार प्रशांत महासागरात एल निनो (El Nino) स्थिती आहे.
✴️ सध्या कमकुवत असलेली ही स्थिती तीव्र होऊन पुढील वर्षाच्या म्हणजेच 2024 च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे.पण, दिलासादायक बाब म्हणजे, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माॅडेलनुसार हिंदी महासागरात उर्वरित पावसाळ्यात आयओडी (Indian Ocean Dipole) ची सकारात्मक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संमिश्र परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!