krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

GDP, ITPO Complex of Pragati Maidan : भारताचा जीडीपी, आयटीपीओ काॅम्प्लेक्य ऑफ प्रगती मैदान आणि पीयूष गोयल

1 min read
GDP, ITPO Complex of Pragati Maidan : मित्रांनो, मागच्या वर्षी पीयूष गोयल साहेब महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले. त्यांना मतदान करणारे बहुतांश आमदार हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले होते. दुदैवाने यातील एकही आमदाराने त्यांना मतदानापूर्वी त्यांचं Vision, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचं नियोजन याच्याबद्दल विचारलं नाही किंवा याबाबत माहिती घेतली नसेल. फक्त पक्षाचा आदेश आहे म्हणून त्यांना मतदान केलं आणि राज्यसभेवर पाठवले.

फेब्रुवारी 2023 मध्ये जेव्हा आंतराष्ट्रीय बाजारात कांद्याचा दर 800 रुपये किलो होता, तेव्हा आपल्याकडे तोच कांदा 5 रुपये किलो दराने विकला जात होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल साहेबांची जबाबदारी होती की, जगभरातल्या भारतीय उच्चायुक्तांमध्ये बसलेल्या वाणिज्य दूतावासांकडून शेतमालभावाविषयी आगाऊ माहिती मागवून निर्यातीचे नियोजन करायची, पण शून्य नियोजनामुळे कांद्याला जिथे 150 ते 200 रुपये प्रति किलो भाव मिळू शकला असता, तिथे 5 रुपये किलो दर मिळाला आणि शेतकऱ्यांचा प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि बरेचशे शेतकरी आता आत्महत्यांच्या उंबरठ्यावर आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार एकट्या मराठवाड्यातच एक लाख शेतकरी आत्महत्यांच्या उंबरठ्यावर आहेत. सध्याच्या शेतकरी आत्महत्येचं प्रमाण पाहता मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मिळून साधारण 2.5 लाख ते 3 लाख शेतकरी आत्महत्यांच्या वाटेवर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढी भयानक आणि स्फोटक परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.

मागच्याच आठवड्यात (बुधवार, दि. 26 जुलै 2023) त्यांच्या मंत्रालयाच्या ITPO (India Trade Promotion Organisation) कॉम्प्लेक्सचं उदघाटन झालं आणि देशाचा GDP रॅकिंग 5 वरून 3 वर आणि 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यस्था करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. त्या कार्यक्रमात त्यांनी शेतकरी संघटनेचे नेते सोडून जवळपास सर्वांनाच बोलवलं आणि पहिल्या लाईनमध्ये बसवलं. ते सर्व कौटुंबिक उद्योग घराण्यातील पोरं हाेती. दुःख या गोष्टीच वाटतं, देशाचा GDP per capita फक्त 2,600 डॉलर आहे आणि GDP per capita रॅकिंग जगात 130 पेक्षा खाली आहे. ती पहिल्या 25 मध्ये कशी येईल, यासाठी कुठलंही नियोजन नाही. फक्त ठराविक कौटुंबिक उद्योग घराण्याचं 10-15 पट नफेखोरीतून उत्पन्न वाढवून देशाच्या GDP त वाढ दाखवायची याचं नियोजन, कौटुंबिक उद्योग घराण्याचं लांगुलचान करून निवडणुकींसाठी पैसे मिळवायचे आणि उर्वरित जनतेला खासकरून ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना ज्यांच्या मतदारसंघातील आमदारांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं, त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. साधं बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेण्याचं सौजन्य सुद्धा पीयूष गोयल साहेबांनी आतापर्यंत दाखवल नाही.

म्हणजे पीयूष गोयल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेलं ITPO कॉम्प्लेक्स आणि देशाचा वाढणारा GDP हा प्रामुख्याने कौटुंबिक उद्योग घरण्याच्याचं फायद्यासाठी राहणार आहे. शेतमाल भावाविषयीच्या शून्य नियोजनामुळे शेतकरी आत्महत्या वाढतच राहणार आहेत, खरंच खूप दुदैवी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!