krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Heavy Rain : आगामी चार दिवस जाेरदार पावसाची शक्यता

1 min read
Heavy Rain : महाराष्ट्रात 28 ते 31 जुलै या चार दिवसांत कोकण व सह्याद्री पर्वत रांगामधील पूर्व उतारावरील सगळे तालुके तसेच विदर्भातील नागपूर पलीकडील 2-4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता (possibility) आहे.

✴️ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या जिल्ह्यांमधील बहुतेक सगळ्या तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी (Extremely heavy Rain) सारखा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

✴️ सह्याद्रीच्या रांगाना लागून असलेल्या पूर्व उतारावरील जिल्ह्यांमधील म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नाशिक या जिल्ह्यातील पश्चिम बाजूस असलेल्या तालुक्यांमध्ये मध्यम ते भारी स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

✴️ विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांमधील बहुतेक तालुक्यात चांगल्या व दमदार पावसाची शक्यता आहे. पण, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

✴️ उर्वरित पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

✴️ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

✴️ पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचाच पाऊस होण्याची शक्यता आहे. ३१ जुलैनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!