Heavy Rain : मुंबई जलमय होण्याची शक्यता
1 min read
🔆 सध्या मान्सूनचा आस त्याच्या नेहमीच्या सरासरी जागेपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. तो जैसलमेर (राजस्थान), कोटा (राजस्थान), छिंदवाडा (मध्य प्रदेश), दुर्ग (छत्तीसगड) या शहरांवरून समुद्र सपाटीपासून 2 किमी उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत पूर्व – पश्चिम आहे.
🔆 वाऱ्याचा शिअर झोन (एकमेकांविरुद्ध वाहणारे वारे) (Wind shear zone) महाराष्ट्राच्या साधारण 20 डिग्री म्हणजे नाशिक शहराच्या अक्षवृत्तावर समुद्र सपाटीपासून 3 ते 7.5 किमी उंच अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत पूर्व-पश्चिम पसरल्यामुळे व त्यातूनच त्या उंचीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तसेच गुजरात राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे रविवार (दि.23 जुलै)पर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
🔆 संपूर्ण विदर्भातही याबरोबर अति-जोरदार पावसाची शक्यताही कायम आहे.
🔆 घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र रविवार (दि.23 जुलै)पासून पुढील 5 दिवस केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. घाट माथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.