Humic acid : ह्युमक ॲसिड म्हणजे काय?
1 min read🔆 शेत जमिनीचा पहिला टप्पा चार भागांनी बनलेला असतो, ज्यात 45 टक्के अन्नद्रव्ये, 25 टक्के हवा, 25 टक्के पाणी, 2 टक्के मृत जीव, 2 टक्के ह्युमस व 1 टक्का जीवजंतू जसे की जीवाणू, बुरशी व किडी इत्यादी.
🔆 ह्युमस (Humic acid) निर्मिती ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सर्व सेंद्रिय घटक (organic matter) जीवाणू, बुरशी व किडी यांच्याकडून त्यांच्या मूळ रूपात कुजविले जातात.
🔆 त्याचबरोबर खडकांचे नैसर्गिकरित्या व अन्नद्रव्यांचे लिथोट्रोपस (Lithotropus) या जंतूंमुळे विघटन होते आणि त्यानंतर या विघटित घटकांचे निरनिराळ्या स्वरुपात पुनर्घटन होते, जसे की ह्युमिन (Humin), ह्युमिक ॲसिड व फलविक ॲसिड (Folic acid) इत्यादी.
🔆 ह्युमिक ॲसिड सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून भरपूर प्रमाणात कार्बन (Carbon) पुरविते. त्यामुळे हेच सूक्ष्मजीव जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
🔆 मुख्यत्वे ह्युमिक ॲसिड एका गाडीसारखे काम करते जे जमिनीत असणारे सर्व अन्नद्रव्ये पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे नेण्यास मदत करते.
🔆 ह्युमिक ॲसिड व अन्नद्रव्ये जसे की पालाश (Potassium), कॅल्शिअम (calcium), मॅग्नेशिअम (magnesium), लोह (Iron), जस्त (zinc), तांबे (Copper), मंगल यांच्या परस्पर आकर्षण असल्याने ही अन्नद्रव्ये ह्युमिक ॲसिडच्या आवरणात आकर्षिले जातात.
🔆 ह्युमिक ॲसिडची गाडी अन्नद्रव्ये वाहून नेऊन पिकाच्या पांढऱ्या मुळांकडे पोहचवितात व मुळे ती अन्नद्रव्ये स्वतःकडे ओढून घेतात.
🔆 हलक्या जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास अडचण होते. कारण ते निचऱ्यावाटे वाहून जात असतात. त्यामुळे तेथे ह्युमिक ॲसिड वापरल्यास अन्नद्रव्ये कार्यक्षमरित्या उपलब्ध होतात व पीक जोमात येऊन उत्पादन वाढ होते.