Rain : महाराष्ट्रात जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
1 min read
✳️ दक्षिणेकडे सरकलेला मान्सून ट्रफ (Monsoon trough) व अरबी समुद्रातील ऑफशोर ट्रफ(Offshore Trough)मुळे मंगळवार (दि. 4 जुलै)पासून कोकणासाेबतच उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.
✳️ मान्सून दरवर्षी सरासरी 8 जुलैला देश काबीज करताे. यावर्षी मान्सून सहा दिवस अगोदर म्हणजे रविवारी (दि. 2 जुलै) देशभरात पोहोचला आहे.
✳️ जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, गुरुवार (दि. 6 जुलै)पासून शेतजमिनीत पूर्ण ओल असेल तेथे पेरणी (Sowing) करण्यास हरकत नाही.
✴️ मंगळवार (दि. 4 जुलै) ते शनिवार (दि. 8 जुलै) या पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात खालीलप्रमाणे पावसाची शक्यता जाणवते.
✴️ कोकण व विदर्भ
मुंबई सबर्बन व शहरासह कोकणातील उर्वरित पाच व विदर्भातील 11 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
✴️ मध्य महाराष्ट्र व मराठवाडा
संपूर्ण खानदेश व नाशिकपासून सांगली, सोलापूरपर्यंतच्या 10 व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
✴️ पूर्वोत्तर सात व उत्तराखंड, केरळ, कर्नाटक राज्यात अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.