krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Grab the Farmer’s Farm : शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हडपण्याचा डाव

1 min read
Grab the Farmer's Farm : इकडे बापाच्या घामाला दाम मिळत नाही आणि तिकडे आमच्या तरुण पोरांचा सत्तास्वार्थासाठी सर्रास वापर होतोय. अरे रे किती वाईट परिस्थिती झाली आपल्या शेतकरी (Farmer) बापाची. सरकार आधी जीवावर उठलं, आता तर ते उरल्या सुरल्या जमिनीच्या तुकडे हडपयला लागलं. शेतकरी कर्ज (Loan) काढतो रात्रंदिवस राबतो. बंपर पिकही (Bumper Crop) घेतो. पण, सरकार बाजारपेठेत हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव पडते. नफा तर सोडाच सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी होत जातो. तो काढलेले कर्ज भरू शकत नाही तो प्रचंड आर्थिक अडचणीत सापडतो. विवळतो, कसा बसा जगतो. जो सहनच करू शकत नाही, तो आपलं जीवन संपवतो आणि आता हेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडणारे सरकार आमच्या जमिनी हडप (Grab the Farmer's Farm) करायला उठले आहे.

याची सुरुवात नाशिक जिल्ह्यात झाली आहे. कर्जाच्या अल्प रक्कमांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने हजारो शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील हक्क काढून घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी टाहो फोडत आहेत. पण, सरकार शेतकऱ्यांचे काही ऐकूण घेत नाही आहे. सर्व राजकीय नेते, पक्ष, पार्ट्या आता त्यांच्यापासून दूर पळत आहेत. या सर्व उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवरील कर्ज अनैतिक आहे. हा सर्व सरकारच्या चुकांचा, सरकारच्या धोरणांचा परिणाम आहे, हे सरकारला अर्थशास्त्रीय परिभाषेत ठणकावून सांगण्यासाठी तसेच सरकारने आपले म्हणने एकूण घ्यावे म्हणून शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात पदयात्रा करीत आहेत.

1 जुलैपासून ललित बहाळे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचा सोमवारी (दि. 3 जुलै) 33 वा दिवस होता. शेतकरी भावांनो, हे आंदोलन तुमचे आमचे सर्वांचे आहे. आज नाशिकचे शेतकरी आहेत, उद्या आपली पाळी येणार आहे. म्हणून शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आपल्या शेतकरी भावांसाठी, आपल्या हक्कासाठी आपल्याला मोठ्या संख्येने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सकारी बँकेसमोर उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.

🟢 शेतकरी तितुका एक एक
🟢 पिकलं तवा लुटलं!
देणं घेणं फिटलं!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!