Fruit cracking : संत्रा, माेसंबी फळांची साल तडकते, ही उपाय योजना करा!
1 min read🍊 फळांची साल तडकणे/फुटण्याची कारणे
✳️ अति उष्ण हवामानात अधिक ओलित करणे व त्यानंतर अधिक काळ पाण्याचा खंड पडणे.
✳️ जमिनीतील ओलावा तसेच तापमान आणि आर्द्रतेतील कमालीचा चढउतार येणे.
✳️ अधिक ताण देऊन नंतर भरपूर ओलित करणे.
✳️ पोटॅशियम, कॅल्शियमची आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता.
✳️ झाडावर अधिक फळे असणे किंवा लदान असणे.
🍊 उपाययोजना
✳️ उष्ण व कोरड्या हवामानात संतुलित ओलित ठेवणे व झाडांना पाण्याचा ताण पडू न देणे.
✳️ झाडाच्या परिघातामध्ये सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
✳️ झाडावर फळांचे प्रमाण योग्य राखणे.
✳️ आंबिया बहारात फळे वाटाण्याच्या आकाराची असताना झाडांवर पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 1 किलो + बोरॉन (300 ग्राम) + 1.5 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करावी.
✳️ ही फवारणी जूनच्या सुरुवातीला किंवा पावसाची सुरुवात होण्याआधी केल्यास या विकृतीची पातळी कमी होण्यास मदत होते.
✳️ पावसाची सुरुवात झाल्यानंतर फळ तडकणे विकृती दिसून आल्यास व जमिनीमध्ये बोरॉन आणि झिंक यांची कमतरता आढळल्यास बोरॉन (300 ग्राम) + झिंक सल्फेट (500 ग्राम) + 100 लिटर पाणी घेऊन झाडांवर फवारणी करावी.