krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Orange, Sweet lemon Fruit dropping : संत्रा, माेसंबी बागेतील फळगळ, पानगळ राेखण्यासाठी या उपाययाेजना करा!

1 min read
Orange, Sweet lemon Fruit dropping : काटाेल, नरखेड, सावनेर व काळमेश्वर तालुक्यांमधील नर्सरीमध्ये (Nursery) व मोसंबी (Sweet lemon) बागेत माेठ्या प्रमाणात फळगळ (Fruit dropping) आणि पानावर डाग (Spots on the leaf) तसेच पानगळसुद्धा (leaf dropping) आढळून येत आहे. हाच प्रकार अमरावती व वर्धा जिल्ह्यातील माेसंबी बागांमध्येहही दिसून येताे. काटाेल तालुक्यात मुख्यत्वे मोसंबी पिकावर म्हणजे नर्सरीमधील झाडांच्या पानांवर तांबूस रंगाचे (Red Spots) व गोलाकार ठिपके (round dots) आढळून येत आहे. नर्सरीमधील मोसंबीच्या झाडांची पाने आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर पाणी साचून पानांना कथ्थ्या रंगाचे डाग (Brown spots) म्हणजे 'फायटोप्थाेरा' (Phytophthora) या बुरशीची (fungus) लागण झाल्याचे तसेच 'काेलेटोट्रोकम' (Colletotrocum) बुरशीचे गोल रिंग सतत येणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे.

🌐 कारणे व प्रसार
✳️ झाडांच्या पानांवर 5-6 तास पाणी साचून राहल्यास या दोन्ही बुरशीची लागण प्रथम नर्सरीमधून होते. परिणामी, पानगळे होऊन त्यातील बुरशीचे कण पाण्याच्या आणि हवेच्या सहाय्याने मोसंबीच्या बागेला प्रथम व नंतर संत्रा बागेला हानी पाेहाेचविते. त्यामुळे संत्रा व माेसंबी बागांना हानी पाेहाेचवून फळगळ हाेण्याची तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेण्याची दाट शक्यता असते.
✳️ दोन वर्षाआधी सुद्धा अशाच प्रकारची फळगळ दिसून आली होती. अलीकडे, नर्सरीमध्ये नागअळीचा प्रादुर्भावही दिसून येत आहे. आर्थिक नुकसान व बागांची हानी टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी याबाबत वेळीच याेग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
✳️ नर्सरीमधील माेसंबीच्या झाडांची पाने कथ्थ्या रंगाची हाेणे, पानांवर कथ्थे डाग तयार हाेणे, पानांच्या काॅर्नरला कथ्था डाग तयार हाेणे तसेच गाेल रिंग म्हणजेच काेलेटाेट्रीकम बुरशीमुळे व फायटाेप्थाेरा बुरशीमुळे पानांवर कथ्थे डाग तयार हाेऊन फळगळ व पानगळ हाेत आहे.

🌐 उपाययाेजना
या बुरशीजन्य राेगाच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी खालील उपाययाेजना कराव्या.
✳️ एलीएट 20 ते 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा बोरडॅक्स मिक्चर 0.6 टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्राम किंवा अँझाक्सास्ट्रोबीन + डायफेनकोनाझोल 10 मिली आणि कोलेट्रोट्रीकम बुरशीच् व्यवस्थापनासाठी थायफोनेट मिथाईल (रोको) 20 ग्राम किंवा कार्बेडाझीम 10 ग्राम (बाव्हीस्टीन) 10 लिटर पाण्यात मिसबुन फवारणी करावी.
✳️ नागअळीच्या व्यवस्थापनासाठी इमिडा क्लोप्रीड 17.8 एस. एल. 5 मिलि किंवा थायमेथोक्झाम 25 डब्लू. जी. 3 ग्राम यापैकी एक कीटकनाशकाची फवारणी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने करावी.
✳️ मोमंबी पिकात फळगळ आढळून येत आहे. पूर्व परिपक्व फळांची गळती माेसंबी पिकात आढळून येत आहे. त्या माेसंबी बागेत शेतकऱ्यांनी मोसंबी झाडास 50 ग्राम फेरस सल्फेट, 50 ग्राम झिंक सल्फेट व व किलाे गांडूळ खत एकमेकात मिसळून जमिनीतून द्यावे.
✳️ सततचा पाऊस किंवा पावसाचा खंड अथवा उघाड पडल्यास जिब्रेलिक आम्ल 1.5 ग्राम कॅल्शियम नायट्रेट दीड किलो – 100 लिटर पाण्यात मिसळून त्याची मोसंबी बागेत उघाडीत फवारणी करावी.


@ डाॅ. प्रदीप दवणे (कीटकशास्त्रज्ञ)
@ डाॅ. एकता बागडे (कीटकशास्त्रज्ञ)
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेला.
प्रादेशिक फळ संशाेधन केंद्र, काटाेल, जिल्हा नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!