Cold : गायब झालेली थंडी महाराष्ट्रात लाटेसह अवतरणार
1 min read
Cold : मागील आठवड्यात म्हणजेच शनिवार (22 नाेव्हेंबर) ते शनिवार (29 नोव्हेंबर) दरम्यान गायब झालेल्या थंडीला (Cold) आज, रविवार (30 नाेव्हेंबर)पासून पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरात थंडी अनुभवली जात असून, राज्यात पुन्हा थंडीच्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे
🔆 या शहरात थंडीची लाट
नाशिक, अहिल्यानगर व जेऊर या तीन शहरात थंडीच्या लाटेची शक्यता बळावली आहे. कारण या तिन्ही शहरांचे तापमान कमी झाले आहे. ते पुढीलप्रमाणे नाशिक 9.9 (-4.8), अहिल्यानगर 9.5 (-4.7) आणि जेऊर 8 (-4.6).
🔆 या ठिकाणी थंडीच्या लाटसदृश स्थिती
राज्यातील पुणे, मुंबई सांताक्रूझ, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वाशिम या शहरांमध्ये थंडीच्या लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या शहरांचे तापमान पुढीलप्रमाणे पुणे 9.8 (-4.1), मुंबई सांताक्रूझ 15.7 (-4.4), रत्नागिरी 16.6(-4.3), छत्रपती संभाजीनगर 10.2 (-4.1), अमरावती 10.7 (-5.7) आणि वाशिम 11.4 (-5.8).
🔆 थंडी आठवडाभर टिकणार
उत्तर भारतातून येणारे ईशान्यई वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून, हवेचा दाब ही पूर्ववत म्हणजे 1014 हेक्टपास्कल होत आहे. त्यामुळे आठवडाभर म्हणजे रविवार (दि. 7 डिसेंबर) (संकष्ट चतुर्थी)पर्यंत महाराष्ट्रात थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
🔆 चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम
‘डिट-वाह’ चक्रीवादळ (Cyclone) रविवारी (30 नाेव्हेंबर) रात्री विरळतेकडे झुकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा विशेष परिणाम जाणवणार नाही, असे दिसते.