Humid atmosphere : पुढील पाच दिवस दमट वातावरण
1 min read🔆 सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भ व कोकणात नकळत उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती आहे आणि हेच मुख्य कारण असून 15 जूनपर्यंत अशीच स्थिती असू शकते.
🔆 त्यानंतर कदाचित वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो. कारण 16 जूनच्या आसपास मान्सून कदाचित गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतो.
🔆 त्याच दरम्यान जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे भागात ‘बिपोरजॉय’ (Biporjoy) वादळातील अति-अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी 25 ते 30 किमी वेगाचे वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल.