Monsoon : मान्सून केरळात दाखल
1 min read🔆 दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या त्याच्या खालील अटी पुर्ण करून जवळपास केरळचा संपूर्ण भाग व तामिळनाडूचा 30 टक्के भाग कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर, व तामिळनाडूतील कोडाईकनल व आदिरामपट्टीनाम शहरातून जाते. मान्सून दाखल होण्याच्या घोषणेसाठी हव्या असलेल्या अटीपैकी खालील 4 अटी पुर्ण केलेल्या आहेत.
❇️ जबरदस्त अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात जमिनीपासून 6 किमी जाडीपर्यंत वाहणारे समुद्री वारे
❇️ केरळकडे जमीन समांतर ताशी 30 ते 35 किमी वाहणारे समुद्री वारे
❇️ आग्नेय अरबी समुद्रात व केरळ किनारपट्टी समोरील अलोट ढगांची दाटी
❇️ संध्याकाळी अरबी समुद्रातून पाणी पृष्ठभागवरून अवकाशात प्रति चौरस मीटर क्षेत्रफळावरून 190 व्याट्स म्हणजे 200 व्याट्स पेक्षा कमी वेगाने उत्सर्जित होऊन बाहेर फेकणारी दिर्घलहरी उष्णताऊर्जा
❇️ पुढील 2 दिवसात कर्नाटकात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता जाणवत आहे.
🔆 सरासरी तारीख 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण 10 जूनला मुंबईत सलामी देतो. तो ह्यावर्षी 8 जूनला केरळात दाखल झाल्यामुळे 18 जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा करू या! त्यातही कमी अधिक 4 दिवसांचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन मुंबईत 14 ते 22 जूनच्या दरम्यान केव्हाही होवु शकते असे वाटते.. मुंबईत मान्सून सेट झाल्यावर सह्याद्री ओलांडून नंतर तो उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो.
🔆 शुक्रवार (दि.९ जून) पासुन त्यापुढील 3 दिवस म्हणजे सोमवार (दि.12 जून) पर्यंत मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
🔆 दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
🔆 ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ (Biporjoy cyclone) आज (गुरुवार, दि. 8 जून) सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात त्याचे ठिकाण असून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटते.